दैनिक स्थैर्य । दि.२४ जानेवारी २०२२ । फलटण । जैन धर्म तीर्थ श्री सम्मेद शिखरजी याचे पावित्र्य राखण्यासाठी केंद्र सरकारला विनंती करण्याची मागणी सकल जैन समाज व भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा च्या वतीने अनुप शहा यांनी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्या कडे केली होती केलेल्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी संविधानाच्या अनुच्छेद 29 अन्वये जैन समाजाचे सर्वोच्च तीर्थक्षेत्र असलेल्या श्री सम्मेद शिखर जी टेकडीची पावित्र्य व स्वच्छता राखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालून जैन समाजाला न्याय द्यावा अशी मागणी भारतीय जैन समाजाच्यावतीने सरकारला माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या वतीने करण्यात आली आहे.
झारखंड राज्यात गिरिडीह जिल्ह्यातील मधुबन येथे असलेल्या श्री सम्मेद शिखर जी डोंगराचा हा एक भाग आहे. प्राचीन काळापासून जैन धर्माच्या अनुयायांचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र आहे. जैन धर्माच्या एकूण 24 तीर्थंकरांपैकी 20 तीर्थंकरांचे निर्वाण स्थान असल्यामुळे, श्री सम्मेद शिखर जी डोंगराचा प्रत्येक कण संपूर्ण जैन समाजासाठी मंदिर परिसरासारखा आदरणीय आणि पूजनीय आहे. वर्षाचे बारा महिनेही जगभरातून लाखो जैन भाविक अत्यंत भक्तिभावाने, अनवाणी पायाने आणि शुद्ध सुती कपड्यांमध्ये रक्त गोठवणार्या थंडीत किंवा कडक उन्हात झारखंडच्या सर्वोच्च डोंगराची ही अत्यंत अवघड 27 किमीची चढाई करून दर्शन करत असतात.पर्वताची पूजा करण्यासाठी जातात.पारसनाथ पर्वताचे पावित्र्य अबाधित राखणे हे सर्व जैन यात्रेकरू आपले सर्वोच्च कर्तव्य मानतात. या डोंगराचे पावित्र्य राखणे हे स्थानिक आदिवासी व नागरिकांनी नेहमीच आपले कर्तव्य मानले असून स्थानिक आदिवासी ग्रामस्थ व जैन समाज यांच्यात कोणताही वाद झाल्याची घटना आजपर्यंत कधीच घडलेली नाही. गेल्या काही महिन्यांपासून सहली आणि सहलीच्या नावाखाली या पवित्र तीर्थक्षेत्राचे पावित्र्य आणि स्वच्छता नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोणत्याही धर्मियांच्या भावना न दुखावता सर्व समाजांशी एकरूप झालेल्या अहिंसा आणि शांतताप्रिय जैन समाजासाठी अत्यंत क्लेशदायक असणारी ही घटना आहे. या पवित्र पर्वतावर पिकनिक, ट्रेकिंग किंवा केवळ मनोरंजनासाठी येणारे प्रवासी अभक्ष आणि मद्यप्राशन करताना आढळून आले आहेत.त्यामुळे, कोणत्याही क्षणी कोणतीही छोटी ठिणगी या संपूर्ण प्रदेशात तसेच संपूर्ण देशात मोठा वाद आणि निषेधास कारणीभूत ठरू शकतात.
त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जैन धर्माच्या या शाश्वत तीर्थक्षेत्राचा एक विशिष्ट परिघ, मधुबनसह संपूर्ण पारसनाथ डोंगरावर अभक्ष आणि मद्यविक्रीसह कडक निर्बंध घालून बंद करण्यात यावेत आणि शिक्षेची तरतूद करण्यात यावी.
अल्पसंख्याक समाजाच्या श्रद्धा, धार्मिक मान्यता, आस्था यांचे रक्षण करणे हे केंद्र सरकारचे कर्तव्य तसेच जबाबदारी आहे. श्री सम्मेद शिखर जी पर्वताचे पावित्र्य राखण्यासाठी जैन समाजाच्यावतीने हे खुले पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला देवून अशी विनंती करत आहेत की झारखंड सरकारला या श्री सम्मेद शिखर जी पर्वताचे योग्य संरक्षण करण्यासाठी झारखंड सरकारला आदेश देण्यात यावेत. धार्मिक अल्पसंख्याक जैन समाजाचा अनुयायी असल्याने, मी केंद्र सरकारला विनंती करतो की, धर्मनिरपेक्ष देश भारतीय राज्यघटनेच्या कलम 29 अन्वये अल्पसंख्याक जैन समाजाच्या सर्वोच्च तीर्थक्षेत्राची पवित्रता आणि स्वच्छता राखावी,यासाठी योग्य ती पावले केंद्र सरकारच्या वतीने उचलली जावीत अशी मागणी करतो असे पत्र माढा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठविले आहे.
श्री सम्मेद शिखर जी पर्वताचे योग्य संरक्षण करण्यासाठी झारखंड सरकारला आदेश देण्यात यावेत, मद्य आणि अभक्ष वस्तू प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करणे अत्यंत आवश्यक आहे. या परिसराचे पावित्र्य राखण्यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या प्रकरणी विनंती करावी अशी मागणी माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर सकल जैन समाज महाराष्ट्र यांच्यावतीने भारतीय जनता पक्षाचे अल्पसंख्याक मोर्चा चे प्रदेश सरचिटणीस अनुप शहा यांच्यासहअशोक कर्णावत नितीन दोशी, वीरेंद्र येदरावे, सौ शोभा नांद्रे श्री बाबुराव मानगावे संतोष पगारिया भावेश जैन स्वप्निल दोशी, संकल्प शहा अनिल डाकलिया सुभाष नहार निखिल उपाध्ये सुजित गांधी महावीर ओसवाल गौरव कोठारी यांनी सकल जैन समाजाच्या वतीने केली होती.