
स्थैर्य, 4 जानेवारी, सातारा : श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त श्री समर्थ सदन येथे रक्तदान आणि महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती मंडळाचे कार्यवाह समर्थ भक्त योगेश बुवा रामदासी यांनी दिली
शुक्रवार, दि.9 जानेवारी रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत रक्तदान शिबिर तसेच सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात हिमोग्लोबिन आणि रक्तातील साखर या मोफत तपासण्या करून मिळणार असून आवश्यकतेनुसार इतर तपासण्या अत्यंत दरात करण्यात येतील. या महाआरोग्य आणि रक्तदान शिबिराचा सर्वसाधारण नागरिकांनी तसेच परिसरातील ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे आवाहनही योगेश बुवा रामदासी यांनी केले आहे.
या महाआरोग्य शिबिरामध्ये डॉ. अजिंक्य दिवेकर (हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, किडणी विकार, ताप, अशक्तपणा, छातीत दुखणे, श्वसनाचे विकार),डॉ. सौ. स्नेहल जगताप (अनियमित मासिक पाळी, पांढरा/जास्त स्त्राव, पोटदुखी, गर्भधारणा सल्ला),डॉ. सौ. अपर्णा भाकरे (डोळ्यांची जळजळ, मोतीबिंदू, नजर कमी होणे, डोळ्यात पाणी/दुखणे),डॉ. रोहित यादव (सांधेदुखी, पाठदुखी, मानदुखी, फॅक्चर, गुडघेदुखी),डॉ. प्रमोद राजभोई (हार्निया, पाइल्स, फिशर, फिस्टुला, पोटातील शस्त्रक्रिया),डॉ. सौ. अश्विनी यादव (त्वचारोग, खाज, पुरळ, फंगल इन्फेक्शन, केस गळणे),डॉ. संकेत प्रभुणे (कान दुखणे, कमी ऐकू येणे, सायनस, घसा दुखणे, आवाज बसणे),डॉ. धीरज खडकबान, (कर्करोग तपासणी, गाठ / जखम बरी न होणे, कर्करोगाबाबत सल्ला),डॉ. उदय सुर्यवंशी व्हिजन डायग्नोस्टिक सेंटर सातारा,डॉ. चैतन्य गोडबोले, डॉ. सौ. चैताली प्रभुणे (व्यसनमुक्ती सल्ला, (तणाव, चिंता, नैराश्य, झोप न लागणे,,डॉ. सुयोग दांडेकर (आयुर्वेद तज्ञ) (सांधेदुखी, आमवात, पचन विकार, वजन नियंत्रण, आयुर्वेदिक उपचार) हे तज्ञ डॉक्टर सहभागी होऊन रुग्णांना मार्गदर्शन करणार आहेत. अधिक माहितीसाठी समर्थ सेवा मंडळाचे विश्वस्त प्रवीण कुलकर्णी,भ्रमणध्वनी – 9822635902 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
