![](https://i0.wp.com/sthairya.com/wp-content/uploads/2025/02/haribaba_haribuva_maharaj_phaltan.jpg?resize=780%2C470&ssl=1)
दैनिक स्थैर्य | दि. ०३ फेब्रुवारी २०२५ | फलटण | फलटण येथे श्री सद्गुरु हरिबुवा महाराज यांचा 126 वा पुण्यतिथी उत्सव रविवार, दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी नऊ वाजता श्री सद्गुरु हरिबुवा अवधूत भजनी मंडळ व भावीक भक्तांच्या उपस्थितीत विणा पूजनाने सुरू झाला. हा उत्सव रविवार दि. 02 फेब्रुवारी 2025 ते सोमवार दिनांक 10 फेब्रुवारी 2025 अखेर संपन्न होणार आहे.
या पुण्यतिथी उत्सवात दैनंदिन कार्यक्रमांचा समावेश आहे. दररोज सकाळी ५:३० ते ६:०० वाजता “श्रीं”ची आरती होईल, तर सायंकाळी ७:०० ते ८:३० वाजता श्री सद्गुरु अवधूत भजनी मंडळ, फलटण यांचे भजन सादर होतील. सकाळी ९:३० ते ११:३० वाजता ह. भ. प. श्री निलेश महाराज शास्त्री वृंदावन यांचे भागवत कथा कथन होईल. दुपारी २:३० ते ४:३० वाजता महिला भजनी मंडळाचे भजन, रात्री ७:०० ते ८:३० वाजता श्री सद्गुरु अवधूत भजनी मंडळ फलटण यांचे भजन, आणि रात्री ९:०० ते ११:०० वाजता श्री सद्गुरु हरिबुवा महाराज सांप्रदायिक भजनी मंडळाचे भजन होतील.
शनिवार दि. 08 फेब्रुवारी 2025 हा मुख्य दिवस असून, सकाळी ६:०० ते ८:०० वाजता “श्री” लघुरुद्र अभिषेक (हरिबुवा महाराज पुण्यतिथी एकादशी) होईल. दुपारी ११:०० ते ३:०० वाजता पंचक्रोशीतील सर्व सांप्रदायिक भजनी मंडळाचे भजन, दुपारी ३:०० ते ५:०० वाजता दादा महाराज भजनी मंडळ फलटण यांचे भजन, आणि सायंकाळी ५:३० ते ७:०० वाजता ओम दत्त चिले ओम भजनी मंडळाचे भजन होतील.
रविवार दि. 09 फेब्रुवारी 2025 रोजी भागवत कथा समाप्ती होईल, सकाळी १०:०० ते १२:०० वाजता श्री अवधूत भजनी मंडळ फलटण यांचे काल्याचे भजन होऊन दुपारी १२:०० ते ३:०० वाजता महाप्रसाद वितरण होईल.
श्री सद्गुरु हरिबुवा साधु महाराज देवस्थान ट्रस्ट फलटण यांनी सर्व भक्त भाविकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून सक्रिय सहभाग नोंदवाव्यात असे आवाहन केले आहे.