गोंदवल्यात गुरुवारी  श्रीराम जन्म सोहळा


स्थैर्य, 25 मार्च, सातारा : गोंदवले येथील श्रीराम मंदिरात श्रीरामनवमी सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम सुरू असून, गुरुवारी (ता. २६) श्रीराम जन्म सोहळा होणार आहे. या वार्षिक यात्रेनिमित्त श्रीरामनवमी उत्सव समितीच्या वतीने छबिना, महाप्रसाद व कुस्त्यांचे आयोजन केले आहे.
श्री ब्रह्मचैतन्य महाराज हे श्रीराम भक्त होते. त्यांनी गोंदवल्यात थोरले व धाकटे अशी दोन श्रीराम मंदिरे स्थापन केली. या दोन्ही मंदिरांना विशेष महत्त्व असल्याने भाविक आवर्जून मंदिरात दर्शनासाठी येतात. श्रीरामनवमी ही गोंदवल्याची वार्षिक यात्रा म्हणून पारंपरिक पद्धतीने आजही साजरी केली जाते. यात्रेनिमित्त श्रीरामनवमी उत्सव समितीने यंदा जोरदार तयारी केली आहे.
श्रीराम मंदिरात अखंड नामस्मरण, अखंड पहारा, तसेच कीर्तन, अभिषेक आदी कार्यक्रम गुढीपाडव्यापासून सुरू आहेत. यात्रा कमिटीच्या वतीनेही श्रीरामनवमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (ता. २७) दुपारी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.रात्री फटाक्यांच्या सातच्या सुमारास आतषबाजीत थोरले श्रीराम मंदिरातून ‘श्रीं’चा पालखी आहे. सोहळा निघणार.’श्रीं’च्या समाधी मंदिरातून पुन्हा ग्रामप्रदक्षिणा करून श्रीराम मंदिरात परतणार आहे. या संपूर्ण उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन श्रीराम नवमी उत्सव समितीने केले आहे.


Back to top button
Don`t copy text!