दैनिक स्थैर्य । दि.०३ फेब्रुवारी २०२२ । नागठाणे । नागठाणे (ता.सातारा) येथील आराध्यदैवत असलेला श्रीराम रथोत्सव यंदा कोरोना साथ रोगाच्या पार्श्वभुमीवर साधेपणाने साजरा करण्यात आला. केवळ मान्यवरांच्या उपस्थितीत रथ पूजन करून साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीच्या माहिती आणि तंत्रज्ञान सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील, कराड उत्तरचे युवा नेते सागरदादा पाटील, न्यू फलटण शुगर वर्क्सचे चेअरमन प्रल्हादराव साळुंखे पाटील या मान्यवरांच्या हस्ते रथाचे पूजन करण्यात आले.
नागठाणे येथील माळावरची यात्रा संपूर्ण जिल्ह्यात प्रसिध्द आहे. हा रथोत्सव पाहण्यासाठी परिसरातून लोक येतात. यावर्षी कोरोनामूळे जिल्हाधिकारी यांनी यात्रा व सभा समारंभावर घातलेल्या बंदी मुळे नागठाणे ग्रामपंचायत, श्रीराम देवस्थान ट्रस्ट तसेच बोरगाव पोलीस यांनी संयुक्तपणे बैठक घेऊन या वर्षी रथोत्सवात होणारी संभाव्य गर्दी टाळून केवळ मान्यवरांच्या उपस्थितीत रथ पूजन करून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता.
आज रथोत्सवाच्या मुख्य दिवशी दुपारी १च्या सुमारास नागठाणे येथील अजिंक्य व्यासपीठा शेजारी रथाचे म्यानवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.तसेच दिवसभर रथ दर्शनासाठी उभा करण्यात आला.भाविकांनी कोरोनाचा नियमांचे पालन करून दिवसभर रथाचे दर्शन घेतले.