
स्थैर्य, 12 मार्च, सातारा : सालाबाद प्रमाणे परमपूज्य जगद्गुरु श्री शृंगेरी शारदा पिठाचे प्रमुख शंकराचार्य श्रीमद भारतीतीर्थ महास्वामी आणि श्री विधुशेखरभारती महास्वामी या दोघांच्या प्रेरणा व आशीर्वादाने सातारा येथील श्रीकृष्ण यजुर्वेद पाठशाळा येथे गुढीपाडवा ते रामनवमी दरम्यान नऊ दिवस श्रीराम महायज्ञाचे आयोजन करण्यात आले. गुरुवारदि. 19 मार्च 2026 गुरुवार दि. 26 मार्च दरम्यान हा महायज्ञ संपन्न होतआहे,अशी माहिती या महायज्ञाचे संयोजक वेदमूर्ती डॉ.विवेक शास्त्री गोडबोले यांनी दिली.
या रामयज्ञ सोहळ्यात गुढीपाडव्याला सकाळी आठ वाजता ब्रह्म ध्वजारोहण म्हणजेच गुढी उभारून शांतिसुक्त पठण ,श्रीराम महायज्ञ प्रधान संकल्प, गणपती पूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदी श्राद्ध वरण, स्थल शुद्धीसाठी उदकशांत, श्रीराम पंचायतन पिठस्त देवतांचे आवाहन पूजन, अग्नि मंथन, अग्नी स्थापना, नवग्रह यज्ञ व पुरुष सूक्त हवन होऊन श्री रामनामाचे हवन केले जाणार आहे यावर्षी या श्रीराम महा यज्ञा बद्दल अधिक माहिती देताना वेदमूर्ती डॉ.विवेक शास्त्री गोडबोले म्हणाले की, सलग नऊ दिवस चालणार्या या श्रीराम सोहळ्याला 26 वर्षे पूर्ण होत आहेत. यावर्षी 25 ब्रह्मवृंद हे सर्वजण सकाळी हवन कुंडामध्ये विविध देवदेवतांच्या प्रित्यर्थ दररोज सुमारे तीन तासाचे हवनविधीत पार पडणार आहेत. तसेच यज्ञस्थळी दररोज प्रवचन, कीर्तन महिलांचे सामुदायिक भजन महाआरती व प्रसाद वितरण असा कार्यक्रम आयोजित केला आहे .
या राम यज्ञ सोहळ्याप्रसंगी दि. 19 मार्च ते बुधवार दि. 25 मार्च दरम्यान सायंकाळी पाच ते आठ या वेळेत वाल्मिकी रामायण कथा सांगितली जाणार असून निरूपण वेदमूर्ती डॉ.विवेकशास्त्री गोडबोले हे असणार असून त्यांना साथ संगत दत्तात्रय डोईफोडे व मिलिंद देवरे करणारा असून सहकारी म्हणून वेदिका गोडबोले -काळे या सहभागी होणार आहेत . दुपारी चार वाजता कल्याण भजनी मंडळ यांच्या भजनाचा कार्यक्रम आहे शुक्रवार दि.20 मार्च रोजी सकाळी आठ ते दुपारी या वेळेत भगवती जगदंबा प्रित्यर्थ श्री सूक्ताचे हवन, श्री रामनाम हवन होणार आहे. दुपारी चार वाजता स्वानंद व वरद विनायक भजनी मंडळ यांची भजन सेवा होणार आहे.
शनिवार दि. मार्च रोजी सकाळी आठ ते दुपारी एक या वेळेत महारुद्र श्री प्रित्यर्थ हवन व रामनामाचे हवन केले जाणार आहे.दुपारी चार वाजता गोंदावलेकर महाराज भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे रविवार दि.22 मार्च रोजी सकाळी आठ वाजता भगवान श्री सूर्यनारायणाची प्रित्यर्थ सौर सूक्त हवन होणार असून रामनामाचे हवन होणार .व दुपारी चार वाजता विष्णू कृपा भजनी मंडळाचे भजन होणार आहे .
दि. 23 मार्च रोजी भवानी शंकर महारुद्र देवता प्रित्यर्थ लघु रुद्र स्वाहाकार व श्रीराम नामाचे हवन होणार असून दुपारी चार वाजता ओमकार भजनी मंडळाचा कार्यक्रम होणार आहे. मंगळवार दि. 24 मार्च रोजी सकाळी आठ वाजता श्री गणपती गणपती अथर्वशीर्ष स्वाहाकार, रामनाम हवन होणार असून दुपारी चार वाजता व्यंकटपुरा पेठ मंडळाचा कार्यक्रम होणार आहे. बुधवार दि. 25 मार्च रोजी सकाळी आठ वाजता दुर्गा अष्टमीनिमित्त दुर्गा सप्तशती पाठ स्वाहाकार व यज्ञ अंगभूत दाम्पत्य आणि कुमारिका पूजन तसेच श्रीराम नामाचे हवन होणार आहे. गुरुवार दि. 26 मार्च रोजी आठ ते एक या वेळेस श्री राम नामाचे हवन होऊन प्रभु श्रीराम चंद्राचे पुरुष सूक्त स्वाहाकार ,उत्तरांग हवन, बलिदान यज्ञ, पूर्ण होती व श्री राम जन्म काळाचे कीर्तन ह.भ.प.वेदिका विवेक गोडबोले -काळे या करणारा असून आभार प्रदर्शन केले जाणार आहे .सायंकाळी पाच ते आठ या वेळेत श्रीराम शोभायात्रा जाणार आहे
श्रीराम नवमीला दुपारी जन्म काळाचे किर्तन झाल्यावर सायंकाळी पाच ते आठ या भव्य शोभायात्राही काढली जाणार आहे .या यज्ञ कुंडामध्ये तांदळाच्या लाह्या अर्थात साळीच्या लाह्या ,तूप ,काळे तीळ असे अन्न अर्पण केले जाते .या राम यज्ञ सोहळ्यात आपण तनमन-धनाने सहभागी होऊन आनंद घ्यावा असे आवाहनही करण्यात आहे.राम यज्ञाच्या अधिक माहितीसाठी 1,चिमणपुरा पेठ येथील श्रीकृष्ण यजुर्वेद पाठशाळा येथे संयोजकांशी संपर्क करावा.

