सातारा शहरासह जिल्ह्यात श्रीराम महायज्ञ ,श्रीराम नवरात्र उत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ.


सातारा – श्रीकृष्ण यजुर्वेद पाठशाळेत यज्ञात आहूती देताना ब्रह्मवृंद (छाया – अतुल देशपांडे ,सातारा)

स्थैर्य, 19 मार्च, सातारा : येथील श्रीकृष्ण यजुर्वेद पाठशाळा येथे गुढीपाडवा ते रामनवमी दरम्यान नऊ दिवस श्रीराम महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे . गुरुवारी 26 मार्च दरम्यान हा महायज्ञ संपन्न होतआहे अशी माहिती या महायज्ञाचे संयोजक वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले यांनी दिली.

या रामयज्ञ सोहळ्यात गुढीपाडव्याला सकाळी आठ वाजता ब्रह्म ध्वजारोहण म्हणजेच गुढी उभारून शांतिसुक्त पठण ,श्रीराम महायज्ञ प्रधान संकल्प, गणपती पूजन, पुण्याहवाचन ,मातृकापूजन ,नांदी श्राद्ध ,आचार्य वरण, स्थलशुद्धीसाठी उदकशांत, श्रीराम पंचायतना सहित पिठस्त देवतांचे आवाहन पूजन ,अग्नि मंथन, अग्नी स्थापना ,नवग्रह यज्ञ व पुरुष सूक्त हवन होऊन श्री रामनामाचे हवन केले.श्रीराम जन्मस्थळी आयोध्या येथील राम मंदिरातील मूर्तीची भव्य प्रतिकृती सातारा येथील स्थानिक मूर्तिकार पोपट कुंभार यांनी बनवली असून त्याला अतिशय सुशोभित असे फुलांनी सजवण्यात आले आहे. रामभक्त हनुमानाची बैलगाडीच्या रूपातील देखणी मूर्ती यज्ञस्थळी उभारण्यात आले असून हे सजावटीचे आकर्षण विशेष लक्षवेधी ठरत आहे.

राम यज्ञस्थळी हवनकुंडा पुढे विविध देवतांचे मंडल स्थापन करून त्या पाठीमागे आयोध्येतील श्रीरामाची उभारलेली केशरी फुलांच्या सजावटीतील भव्य प्रतिकृती विशेष लक्षवेधक करत आहे .
मंडप तसेच यज्ञस्थळी काढलेल्या भव्य रांगोळ्या केलेली आकर्षक सजावट फुला पानांची देखणी व सुबक नक्षीदार कमानी आणि सजावट तसेच नारळ ,केळी यांच्या झावळ्या आणि विविध प्रकारचे आकाश कंदील विशेष लक्ष वेधून घेणारे ठरत आहेत

यावर्षी श्रीकृष्ण यजुर्वेद पाठ शाळेत धनुरधारी रामाची भव्य मूर्ती यावर्षी या यज्ञ स्थळाचे विशेष आकर्षण आहे. यज्ञस्थळाच्या प्रांगणात काढलेल्या भव्य विविधरंगी रांगोळ्या तसेच नयन मनोहर असे आकाश कंदील लक्ष वेधून घेणारे आहेत या श्रीराम महायज्ञ स्थळी विविध देवदेवतांचे पीठ स्थापन करण्यात आले असून त्याला पार्श्वभूमी म्हणून अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील बाल श्रीराम ची भव्य मूर्तीचा कट आउट फ्लेक्स लक्ष वेधून घेणारा आहे .
या श्रीराम महा यज्ञा बद्दल अधिक माहिती देताना वेदमूर्ती विवेक शास्त्री गोडबोले म्हणाले की ,सलग नऊ दिवस चालणार्‍या या श्रीराम महायज्ञ सोहळ्याला 26 वर्षे पूर्ण होत आहेत .

यावर्षी तब्बल 25 ब्रह्मवृंद सातारा, पुणे ,कोल्हापूर, सांगली ,उगार या परिसरातून पाठशाळेत दाखल झाले असून हे सर्वजण सकाळी हवन कुंडामध्ये विविध देवदेवतांच्या प्रित्यर्थ दररोज सुमारे तीन तासाचे हवनविधीत पार पडणार आहेत तसेच यज्ञस्थळी दररोज प्रवचन कीर्तन महिलांचे सामुदायिक भजन महाआरती व हातामध्ये प्रसाद वितरण असा कार्यक्रम आयोजित केला आहे श्रीराम नवमीला दुपारी जन्म काळाचे किर्तन झाल्यावर सायंकाळी पाच ते आठ या वेळेत भव्य शोभायात्राही काढली जाणार आहे या यज्ञ कुंडामध्ये तांदळाच्या लाह्या अर्थात जाळी तूप काळे तीळ असे अन्न अर्पण केले जाते वेदमूर्ती विवेक शास्त्री गोडबोले यांचे समावेश वेदमूर्ती तपन शास्त्री नातू ,वेदमूर्ती संतोषशास्त्री अभ्यंकर ,वेदमूर्ती विश्वजीत गोडबोले ,वेदमूर्ती प्रकाशशास्त्री करंदीकर यांचे सह विविध मान्यवर ब्रह्मवृंद या यज्ञ सोहळ्यात सहभागी झाले आहेत, . या राम यज्ञ सोहळ्यात आपण तनमन-धनाने सहभागी होऊन आनंद घ्यावा असे आवाहनही करण्यात आले आहे.राम यज्ञाच्या अधिक माहितीसाठी 1,चिमणपुरा पेठ येथील श्रीकृष्ण यजुर्वेद पाठशाळा येथे संयोजकांशी संपर्क करावा.

दरम्यान ,सातारा येथील श्री काळाराम मंदिरातही श्रीराम नवरात्र उत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. सर्व विश्वस्तांच्या वतीने या उत्सव काळामध्ये दररोज रामनवमीपर्यंत सकाळी पाच ते साडेपाच या वेळेत काकड आरती सकाळी साडेपाच वाजता श्रीरामाला अभिषेक, सकाळी आठ ते साडेआठ श्रीरामाची आरती, दुपारी बारा वाजता महानैवेद्य, दुपारी चार वाजता विविध भजनी मंडळाचे भजन, सायंकाळी सहा ते सात या वेळेत अध्यात्म रामायण वेदमूर्ती श्री चंद्रशेखरशास्त्री जोशी हे निरूपण करणार आहेत. दररोज रात्री साडेनऊ वाजता राम मंदिरात महाआरती आयोजित केली आहे .

उत्सव काळामध्ये कार्यक्रमांमध्ये 19 मार्च रोजी सकाळी साडेसहा ते सात या वेळेत गुढीपाडव्यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महिलांसाठी तर्फे कार्यक्रम संपन्न झाला .तसेच शुक्रवार दिनांक 20 मार्च रोजी सायंकाळी सात ते नऊ या वेळेत नारायणी ग्रुप यांचा शिवतांडव श्रीराम तांडव स्तोत्र कार्यक्रमावर असून रात्री दहा वाजता माहेश्वरी भजनी मंडळाचे भजन होणार आहे .रविवार दि. 22 मार्च रोजी सायंकाळी चार वाजता रामकृष्ण भजनी मंडळाच्या पठणाचा कार्यक्रम आणि सायंकाळी सात वाजता भक्ती नाईक यांचे भरतनाट्यम होणार आहे .तसेच 23 मार्च रोजी सोमवारी सायंकाळी चार ते पाच या वेळेत व्यंकटपुरा भजनी मंडळाचे भजन व सायंकाळी सात वाजता सौ .अपर्णा मूतालिक आणि वर्गाचे रामरक्षा पठण होणार आहे .24 मार्च रोजी मंगळवारी सायंकाळी चार वाजता वैदेही पुरोहित यांच्या भजनाचा कार्यक्रम तसेच रात्री साडेसात वाजता सुनिता निमकर यांचा स्वरमय गाण्याचा कार्यक्रम होणार आहे बुधवार दिनांक 25 मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजता सत्संग मंडळ गुजराती सत्संग होणारा असून गुरुवारी 26 मार्च ला राम जन्म काळाचे किर्तन ध्रुव पटवर्धन सादर करणारा असून बालाजी ब्लड सेंटरच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .रात्री दहा वाजता महाकर्पूर आरती होऊन शुक्रवार दिनांक 27 मार्च रोजी सायंकाळी महिलांसाठी मेहंदी स्पर्धा महिलांकरता आयोजित केली असून सायंकाळी सात वाजता रामनवमी समाप्ती निमित्त ललिताचा कार्यक्रम संपन्न होणारे अशी माहिती विश्वस्त हर्ष शहा व मोहन शहा यांनी दिली.

दरम्यान सातारा येथील प्रतापगंज पेठेतील श्रीगोरा राम मंदिर ,शनिवार पेठेतील श्री माटे राम मंदिर, समर्थ मंदिर परिसरातील श्री दामले राम मंदिर तसेच संगम माहूली येथील श्रीराम मंदिर आणि शाहूपुरी गेंडा माळ येथील पाटील परिवाराच्या शांत राम अर्थात राम ध्यान मंदिरातही नवरात्र उत्सवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. सातारा शहरा नजीकच्या सज्जनगड येथील श्री रामदास स्वामी संस्थान व श्री समर्थ सेवा मंडळाचे वतीने समाधी मंदिरातील श्रीराम पंचायतन मूर्ती आणि मंडळाच्या राम भक्त निवास मध्ये असलेल्या श्रीराम पंचायतन मूर्तींपुढे विविध धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजित करण्यात आयोजन करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यातील दुष्काळी अशा माण तालुक्यातील श्री क्षेत्र गोंदवले बुद्रुक येथे श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या समाधी मंदिर परिसरात तसेच गावातील श्री थोरले राम मंदिर व धाकटे राम मंदिरातही रामनवरात्रात चा मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला .फलटण येथील नाईक निंबाळकर राजघराण्याच्या श्रीराम मंदिरातही विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.वावरहिरे येथील श्री हनुमंत महाराज मंदिरातही राम नवरात्रात निमित्त भजन,कीर्तन ,प्रवचन, मंत्रजागर असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत .


Back to top button
Don`t copy text!