
दैनिक स्थैर्य । 7 एप्रिल 2025। फलटण । येथील प्राचीन ऐतिहासिक श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात हजारो भाविकांच्या साक्षीने पार पडला.
फलटण येथील श्रीराम मंदिरला ऐतिहासिक वारसा असून येथील श्रीराम जन्मोत्सव सोहळा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आजही भाविकांच्या अलोट उत्साहात श्रीराम जन्मोत्सव सोहळा पार पडला. सकाळपासूनच भाविकांनी प्रभू रामाच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये गर्दी केली होती.
जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम झाले. मंदिरातील गाभार्यामध्ये आकर्षक सजावट करण्यात आली होती. श्रीराम जन्मोत्सव निमित्त राजपुरोहित चंद्रकांत वादे यांच्या अधिपत्याखाली 11 ब्राम्हणांच्या उपस्थितीत लघुरुद्राभिषेक श्रीराम मंदिरमध्ये प्रभु श्रीरामाला घालण्यात आला.
दुपारी बारा वाजता श्रीराम जन्मोत्सव सोहळा राजघराण्यातील विधान परिषदेचे माजी सभापती व आमदार तथा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर, जि. प. माजी अध्यक्ष तथा नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्टचे सचिव संजीवराजे निंबाळकर, कृषि उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष व विश्वस्त रघुनाथराजे नाईक निंबाळकर, पंचायत समिती माजी सभापती विश्वजीत राजे नाईक निंबाळकर, ट्रस्टचे विश्वस्त अनिकेतराजे नाईक निंबाळकर, सत्यजीतराजे नाईक निंबाळकर, माजी नगरसेविका सुभद्राराजे नाईक निंबाळकर, माजी जि.प.सदस्या शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, मिथिलाराजे नाईक निंबाळकर, वसुंधराराजे नाईक निंबाळकर, ह.भ.प आफळे महाराज, नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त शरद रणवरे, नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्टचे व्यवस्थापक दशरथ यादव, पोलीस, महसूल व नगर पालिका प्रशासन अधिकारी यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.