दैनिक स्थैर्य | दि. ३० मार्च २०२३ | फलटण |
फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी येथे श्रीराम जन्मोत्सव सोहळा पारंपरिक धार्मिक पद्धतीने उत्साहात पार पडला.
यावेळी हभप अंकुश महाराज फुगे यांनी सुश्राव्य किर्तनातून श्रीराम जन्मकाळाचे वर्णन केले. ग्रामदैवत दक्षिणमुखी हनुमान मंदिरामध्ये महिलांनी श्रीराम जन्मोत्सव पाळणा गायला.सात दिवस श्री गोंदवलेकर महाराज रामजप संकुलास सुरुवात झाली आहे. श्रीराम जन्माच्या ओवींचे भागवत महाराज भारती यांनी वाचन केले.
यावेळी गोखळी आणि पंचक्रोशीत ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. रामनवमीपासून हनुमान जयंती यात्रा उत्सवास प्रारंभ झाला. यात्रा उत्सव काळात ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन व नंतर महाप्रसाद आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.