
दैनिक स्थैर्य । 16 मार्च 2025। फलटण। वडजल ता.फलटण येथील श्री पांडुरंग प्रसाद आश्रमाचे संस्थापक ह.भ.प. जितोबा महाराज जाधव व ह.भ.प.सुशांत महाराज जाधव यांनी त्यांच्या मालकीची टाटा झिप ही गाडी ज्ञानेश गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था भाडळी बुद्रुक येथील या संस्थेस भेट दिली.
दानशूर व ग्रामस्थांच्या सहकार्याने गतवर्षी भाडळी बुद्रुक येथे ज्ञानेश गुरुकुल वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली. संस्थेची गरज ओळखुन श्री पांडुरंग प्रसाद आश्रमचे संस्थापक ह.भ.प. जितोबा जाधव महाराज यांनी स्वतःच्या मालकीची मालवाहतुक गाडी संस्थेस भेट देऊन नवीन आदर्श निर्माण केला.
या गाडीचे हस्तांतरण नुकतेच मान्यवर आणि संस्थेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी श्री.जाधव महाराज यांनी यापुढेही असेच समाजोपयोगी कार्य व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. विकास सोसायटीचे संस्थापक चेअरमन मोहनराव डांगे यांनी याबद्दल धन्यवाद व्यक्त केले. अध्यक्ष ह. भ. प. स्वप्निल महाराज शेंडे यांनी स्वागत केले. सचिव ह. भ. प. राहुल महाराज शेंडे यांनी आभार मानले.