बारामतीत श्री महेश नवमी उत्साहात साजरी


दैनिक स्थैर्य । 6 जून 2025। बारामती । माहेश्वरी समाज जगभर विखुरलेला असून सुमारे 200 वर्षापासून समाजातील काही परिवार जसे की लाहोटी, सोमाणी, सोनी, सिकची, काबरा, राठी, झंवर,बागडी, करवा, नावंधर, मालपाणी हे परिवार वेगवेगळ्या व्यवसायाच्या माध्यमातून कार्यरत आहे. ख-या लौकिक अर्थाने मारवाडी संबोधला जाणारा समाज. त्याचाआराध्य दैवत श्री. महेश, म्हणून माहेश्वरी अशी ओळख.

बारामती माहेश्वरी समाजाच्यावतीने सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. समाजाच्यावतीने शोभायात्रा काढण्यात आली.ही शोभायात्रा बालाजी मंदिर पासून गांधी चौक, सिध्देश्वर मंदिराबाहेर, महावीर पथ मार्गे परत बालाजी मदिर अशी काढण्यात आली.

या शोभायात्रेत माजी नगराध्यक्ष सुभाषशेठ सोमाणी, बारामती व्यापारी महासंघाचे विद्यमान अध्यक्ष व कॉसमॉस बँकेचे संचालक सुशीलकुमार सोमाणी, बारामती सहकारी बँकेचे संचालक व विद्या प्रतिष्ठान संस्थेचे विश्वस्त मंदार सिकची, भाजपा पुणे जिल्हा व्यापार आघाडीचे अध्यक्ष संजय सोमाणी तसेच बांधव, महिला व युवावर्ग सहभागी झाले होते.

यावेळी बारामती माहेश्वरी प्रिमीयर लीगच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. माहेश्वरी महिला मंडळानेही विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. कार्यक्रमाचे आयोजन बारामती तालुका माहेश्वरी सभा अध्यक्ष शामसुंदर सोनी, सचिव अ‍ॅड. सिद्धार्थ सोमाणी, बारामती माहेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. सुनीता राठी, उपाध्यक्षा सौ. संगीता राठी यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!