दैनिक स्थैर्य । दि. २९ जून २०२३ । फलटण । श्रीदत्त इंडिया प्रा. लि., साखरवाडी साखर कारखान्याने यावर्षीच्या सन २०२३ – २४ च्या गळीत हंगामामध्ये १० लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून त्या अनुषंगाने तोडणी व वाहतूक यंत्रणेची करार प्रक्रिया पार पडली आहे, तसेच मागील ४ गळीत हंगामामध्ये या कारखान्याकडे गाळपासाठी ऊस दिलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळच्या वेळी दिलेल्या चोख पेमेंट मुळे १० लाख मे. टन गाळप होण्यास कोणतीही अडचण येणार नसल्याचे स्पष्ट प्रतिपादन श्री दत्त इंडिया साखर कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप यांनी केले.
श्री दत्त इंडिया साखर कारखाना साखरवाडी कारखान्याच्या ५ व्या गळीत हंगामातील मिल रोलर पूजन प्रसंगी अजितराव जगताप बोलत होते. श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प. पू. महंत श्यामसुंदर शास्त्री यांच्या हस्ते वीज यंत्रणेचे बटन दाबून मिल रोलर बसविण्याच्या कामाचा शुभारंभ समारंभपूर्वक करण्यात आला. तत्पूर्वी इंजिनिअरिंग विभागाचे डेप्युटी चीफ इंजिनियर नितीन रणवरे यांच्या हस्ते मिल रोलर पूजन करण्यात आले.
अजितराव जगताप म्हणाले, मागील हंगामा पासून कारखान्याची गाळप क्षमता वाढली असून दैनंदिन ८ हजार मे. टन क्षमतेने कारखान्याचे गाळप होणार आहे. शेतकऱ्यांच्या ऊसाचे वेळेत गाळप होण्यास यामुळे मदत होणार आहे. त्यामुळे फलटण तालुक्यातील व भागातील सर्व शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण ऊस या कारखान्यास गाळपासाठी पाठवावा. कार्यक्रमास श्री दत्त इंडियाचे संचालक चेतन धरु ,चीफ इंजिनिअर अजित कदम, को – जन मॅनेजर दिपक मोरे, केन मॅनेजर सदानंद पाटील, शेतकी अधिकारी रमेश बागनवर, एचआर विराज जोशी, ऋतुराज पाटील, डेप्युटी चीफ इंजिअर किशोर फडतरे, प्रोडक्शन जी एम भारत तावरे, डेप्युटी केमिस्ट नितीन नाईकनवरे, सुरक्षा अधिकारी अजय कदम, फलटण तालुका साखर कामगार युनियनचे राजेंद्र भोसले, पै. संतोष भोसले, पै. महेश भोसले, खजिनदार गोरख भोसले, केन सुपरवायझर एस. के. भोसले यांच्या सह परीसरातील शेतकरी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.