श्री दत्तात्रेय जयंती हीच जीवनक्रांती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


अत्री त्रृषी व सती अनसूया मातेच्या भक्तीपोटी मार्गशीर्ष पौर्णिमा तिन्हेसांजेला दत्त (ब्रह्मा,विष्णू ,महेश)जन्मसोहळा संपन्न.(तिन्ही देवता इच्छा भोजन पौराणिक कथा आपणाला ज्ञात असावी)

दत्त म्हणेज हाक मारताच जो उभा राहतो तोच दत्तात्रेय होय. उत्पत्ती स्थिती गती याचा भावार्थ बालपण तरुणपण म्हातारपण व्यवस्थित जागता येणे.

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वलल्भ दिगंबरा दिग म्हणजे दिशा व अंबर म्हणजे आकाश याचा भावार्थ रिकाम्या हाताने येणे व जाणे.दत्त महाराजांच्या काखेत झोळी पोटापूरते कमविणे.हातात ज्ञानरुपी कमडंलू.मृत्यू अटळ डमरु,शंख जागृती,गदा अन्यायाविरोधी लढा,चक्र सुख दुःखाचे कालचक्र,पुढे श्वान ,पाठीमागे गाय,औदुबंर वृक्ष याचा मतितार्थ प्राणी मात्रांवर दया करा,वृक्ष लागवड करा.

गुरुचरित्र,नवनाथ भक्तिसार,गुरुपदीचे गुणगान,भजन,प्रवचन,कीर्तन ,महाप्रसाद याबरोबरच दीन दलित अनाथ गरजू उपेक्षित दुर्लेक्षित मातापिता ज्येष्ठांची सेवा हीच खरी दत्त सेवा होय.

दत्तभक्ती आंधळी नसावी.तिला डोळसपणाची नजर हवी. आपल्यातील भगवंताला जागं करणं. ज्येष्ठांची सेवा करणं ,लाडीलबाडी पासून दूर रहाणं, सत्कर्म करणं,दानधर्म करणं ,वाचन , लेखन, सुयोग्य भाषण ,योग्य आचरण , सदा लिनता हीच खरी दत्त सेवा.

तीन शिरे सहा हात / तया माझे दंडवत/
काखे झोळी पुढं श्वान / नित्य जान्हीवच स्नान/
माथा शोभे जटाभार/ अंगी विभूती सुंदर /
शंख चक्र गदा हाती/ पायी खडावा गर्जती/
तुका म्हणे दिगंबर / तया माझा नमस्कार //

दत्त शरीररुपी देहात रुजावणे व जीवनकार्य आचरणे हीच दत्त जयंती

आपलाच दत्तशिष्य – प्रा. रवींद्र कोकरे – ग्रामीण कथाकार,

श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण.
९४२१२१६८२१


Back to top button
Don`t copy text!