
दैनिक स्थैर्य | दि. १३ डिसेंबर २०२४ | फलटण |
फलटण येथील अहिल्यानगरमधील गजानन चौकातील श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या वतीने श्री दत्त जयंती उत्सव शनिवार, दि. १४ डिसेंबर २०२४ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
यानिमित्त सकाळी ६ ते ७ ‘श्रीं’ना स्नान, सकाळी ७:३० वा. आरती, सकाळी ८ ते ९ अभिषेक, दुपारी १२:३० वा. नैवेद्य व आरती. सायंकाळी ६ ते ७ महिला भजनी मंडळांचे भजन. सायंकाळी ६:३० वा. पाळणा व जन्मकाळ, सायंकाळी ७:३० वा. महाआरती व आरती झाल्यानंतर उपस्थित भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे.
भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.