श्री चक्रधर स्वामी अवतरण अष्टशताब्दी वर्ष महानुभाव परिषदेच्या सदस्यांनी घेतली राज्यपालांची भेट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १७ जून २०२२ । मुंबई । महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधरस्वामी यांच्या अवतरण अष्टशताब्दी वर्षानिमित्त अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत विध्वांस बाबा यांच्या अध्यक्षतेखाली एका शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.

शिष्टमंडळाने राज्यपालांना श्री चक्रधर स्वामींच्या कार्याची माहिती दिली तसेच श्रीक्षेत्र डोमेगाव व रिद्धपुर येथे भेट देण्याची विनंती केली.

महात्मा हंसराजबाबा महानुभाव खामणीकर, महात्मा चेतन नागराज, ॲड. तृप्ती बोरकुटे, बन्सीधर राजूरकर, महात्मा सागरदादा, देवेंद्र भुजबळ, साजन शेंडे, हरिहर पांडे आदी उपस्थित होते.

यावेळी दैनिक सकाळ माध्यम समूहाच्या विदर्भ आवृत्तीचे कार्यकारी संपादक संदीप भारंबे यांनी राज्यपालांना सकाळ महानुभाव स्थान महात्म्य अभियानाची माहिती दिली.


Back to top button
Don`t copy text!