श्री. छ. ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कन्येचा गुरुवारी विवाह सोहळा


स्थैर्य, सातारा, दि. 3 डिसेंबर : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कन्या राजकुमारी ऋणालीराजे व पृथ्वीराज देशमुख रा. कडेपूर, सांगली यांचे सुपुत्र चि. रविराज यांचा विवाहसोहळा गुरुवार दि. 4 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.21 वाजता शेंद्रे ता. सातारा येथील स्व. अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवन येथे संपन्न होणार आहे. या सोहळ्याला सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, साहित्य, कला, क्रीडा आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या विवाहसोहळ्याच्या निमंत्रण पत्रिका विविध मान्यवरांसह जनतेपर्यंत पोहचवण्यात आल्या आहेत. तथापी, नजरचुकीने कोणाला निमंत्रण पत्रिका मिळाली नसेल त्यांनी या सोहळ्याला आपल्याच घरचे मंगल कार्य समजून अगत्यपूर्वक उपस्थित राहून वधू- वरास शुभाशीर्वाद द्यावेत, असे आवाहन श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले आणि ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!