दैनिक स्थैर्य । दि.०८ एप्रिल २०२२ । फलटण । श्री. अविनाश खलाटे यांनी जिल्हा मध्यवर्ती बँके मध्ये काम करत असताना सर्वसामान्य लोकांची कामे निस्वार्थीपणे केली. 1988 साली लेखनिक पदावर नियुक्ती झाली. त्यानंतर बँक सुपरवायझर, विकास अधिकारी ,शाखाप्रमुख ,मार्केटिंग ऑफिसर, वसुली अधिकारी व विभागीय विकास अधिकारी या पदावर त्यांनी चांगले कामकाज केले त्याच बरोबर सेवकांच्या प्रश्नासाठी बँक एम्प्लॉईज युनियन कोल्हापूर या संघटने मध्ये चांगल्या प्रकारचे काम केले त्यामुळे त्यांना बँकेवर संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली आदरणीय महाराज साहेब यांचे आशीर्वाद सतत लाभले. त्यानंतर त्यांनी खुंटे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे पॅनेल भरघोस मतांनी निवडून आणले व सोसायटीच्या चेअरमन पदावर त्यांची निवड झाली बँकेमध्ये काम करत असताना सोसायट्यांची कामकाज कसे चालते हे त्यांना चांगलेच माहीत असल्यामुळे गावच्या लोकांनी त्यांना सर्वाधिक मताने निवडून देऊन पॅनलचे उमेदवार ही निवडून दिले. यांचा वाढदिवस यशवंतराव चव्हाण 79 तर्फे धुमधडाक्यात साजरा करण्यात आला याप्रसंगी श्री मिलिंद आप्पा नेवसे मा. फलटण तालुकाअध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, डॉक्टर श्रीकांत मोहिते, मनोहर गायकवाड, नौशाद पठाण, अतुल गांधी, प्रदीप तारळकर आदी मान्यवर उपस्थित होते