दैनिक स्थैर्य | दि. १४ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
फलटण येथील ‘श्रीराम बझार’तर्फे येणार्या दीपावलीनिमित्त ग्राहकांसाठी खरेदीवर खास अशी ‘दीपावली भव्य बक्षीस योजना २०२४’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत ग्राहकांना खरेदीवर ‘१६६८४’ भव्य बक्षिसांचा पाऊस पडणार आहे.
‘विजयादशमी (दसर्याच्या)’ शुभमुहूर्तापासून रु.५००/- व त्या पटीत रोख खरेदीवरील कुपन बक्षीस योजना सुरू झाली असून ही योजना ही योजना १ नोव्हेंबर २०२४ या मुदतीतील खरेदीवर लागू राहणार आहे.
श्रीराम बझारने आपल्या असंख्य ग्राहक, ठेवीदार, सभासद व हितचिंतक यांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या असून या योजनेत जास्तीत जास्त ग्राहकांनी सहभाग घेऊन बक्षिसांची लुट करावी, असे आवाहन श्रीराम बझारच्या संचालकांनी केले आहे.
सध्याच्या महागाईच्या काळात श्रीराम बझारने असंख्य ग्राहकांना दिलासा म्हणून दिवाळीसाठी लागणारा सर्व दर्जेदार, निवडक माल सवलतीच्या आणि रास्त दरात उपलब्ध करून दिला आहे.
सदर बक्षीस योजना संस्थेचे मुख्य कार्यालय फलटण, तरडगाव, लोणंद, दहिवडी, पवारवाडी, गोंदवले बु॥, मलठण, महात्मा फुले शॉपिंग सेंटर, कोरेगाव, म्हसवड, शिरवळ, कोळकी, बारामती व साखरवाडी या शाखांवरतीही लागू राहणार आहे. तसेच प्रत्येक ग्राहकास रुपये २००० व त्यापटीत रोख खरेदीवर एक शॉपिंग बॅग मोफत मिळणार आहे.
या योजनेतील पहिल्या तीन विजेत्यांना दुचाकी बक्षीस मिळणार असून अन्य बक्षिसे, त्यांची संख्या पुढीलप्रमाणे :
‘इन्कमटॅक्स नियमाप्रमाणे बक्षीस क्र. १ ते ७ विजेत्यास देणेत येणारे करपात्र बक्षिसांवरील मोटरसायकल वाहनांचा आर.टी.ओ., टॅक्स, विमा, रोड टॅक्स, पासिंग व इतर बक्षिसावरील इन्कम टॅक्स (टी.डी.एस.) व इतर तत्सम लागू असणारे शासकीय कर व खर्च विजेत्यास भरावे लागतील.
- या योजनेसाठी नियम व अटी लागू असून या योजनेची सोडत शनिवार, दि. २ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी ४:०० वाजता श्रीराम बझार, फलटण येथे निघणार आहे.
- या बक्षीस योजनेच्या सविस्तर नियम व अटी संस्थेच्या मुख्य कार्यालयात व शाखांवर पहावयास मिळतील.
- बक्षीस क्र. १ ते १२ या बक्षिसांचा कुपन ड्रॉ मुख्य कार्यालय फलटण येथे काढला जाईल.
- सदरची बक्षिसे विजेत्यांना दि.०६.११.२०२४ ते दि.३१.१२.२०२४ या कालावधीतच दिली जातील.
- दर्शविलेल्या चित्रामध्ये असणारी वस्तू व प्रत्यक्ष मिळणान्या वस्तू (रंग डिझाईन) इत्यादीमध्ये फरक असू शकतो.
योजनेच्या अधिक माहितीसाठी श्रीराम बझारच्या ०२१६६-२२०७०२/२२०८५८ या फोन क्रमांकावर संपर्क करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.