दैनिक स्थैर्य | दि. ३१ जुलै २०२३ | फलटण |
जोर ( पुनर्वसन) वाखरी (ता. फलटण) व कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण दत्तक गाव योजनेंतर्गत विशेष सहकार्यातून गावचे ग्रामदैवत श्री जननी उपकर्ती कुंभळजाई माता व इतर देवस्थान श्री उपकर्ती जननी कुभळजाई मूर्ती स्थापना व उद्घाटन सोहळा आज होत असून यानिमित्त अधिक श्रावण शुद्ध चौदा मंदिराभोवती प्रदक्षिणा व सायंकाळी ६.०५ मिनिटांनी पालखी सोहळा तसेच मंगळवार, दि. १ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ९.३० वाजता गंगापूजन व मूर्ती स्थापना वृक्षारोपण कार्यक्रम सकाळी १०.३० ते ११.०० पर्यंत हवन व ११.३० वाजता उद्घाटन होणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमदार दीपकराव चव्हाण भूषविणार असून माजी जि.प. अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणचे व्हाईस चेअरमन श्री. भगवान दादासो होळकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
कार्यक्रमास प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसीलदार डॉ. अनिल कुमार जाधव, धोम बलकवडी धरणग्रस्त पुनर्वसन संघटनेचे अध्यक्ष श्री. संपतभाऊ कळंबे, धोम बलकवडी पुनर्वसन संघटनेचे सदस्य श्री. प्रभाकर गोळे, श्री. महादेव बंदे, श्री. सदाशिव गोळे, श्री. तुकाराम गोळे व श्री उपकर्ती जननी कुंभळजाई मंदिर कमिटी हे उपस्थित राहणार आहेत.