बारामती मध्ये १३ फेब्रुवारी रोजी श्री गजानन महाराज प्रगटदिन व पालखी सोहळा


दैनिक स्थैर्य । दि. १० फेब्रुवारी २०२३ । बारामती । सोमवार दि. १३ फेब्रुवारी २०२३ रोजी श्री गजानन महाराज प्रगटदिन व पालखी सोहळा चे आयोजन करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री गजानन महाराज, श्री सिद्धीविनायक, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कै.दि.ब. तावरे उद्यान, अशोकनगर, या ठिकाणी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सायंकाळी ७ वा. श्रींची आरती व महाप्रसाद चे आयोजन करण्यात आले आहे तरी श्री चे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेऊन श्री कृपा आशिर्वाद घेण्याचे आवाहन अशोकनगर सार्वजनिक मंडळ श्री गजानन महाराज सत्संग मंडळ, यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!