दैनिक स्थैर्य | दि. २१ मार्च २०२३ | फलटण |
श्री दत्त इंडिया प्रा. लि. साखरवाडीचा चौथा गळीत हंगाम तालुक्यात उच्चांकी ६ लाख ८० हजार ९३६ मेट्रिक टन ऊस गाळप करून मान्यवरांच्या उपस्थितीत सांगता समारंभाने संपन्न झाला.
या गळीत हंगामत २०२२-२३ मध्ये ६ लाख ८० हजार ६३६ मे. टन ऊस गाळप करून गाळप केलेल्या उसाचे प्रती मे. टन रक्कम रुपये २७७२/- प्रमाणे रक्कम रुपये १८८,७५,५४,५९२/- (एकशे अठ्याऐंशी कोटी पंच्याहत्तर लाख चोपन्न हजार पाचशे ब्यान्नव फक्त) चे संपूर्ण ऊस बिल एकरकमी वेळेत ऊस पुरवठा करणार्या शेतकर्यांच्या खात्यावर अदा केले आहे, अशी माहिती प्रशासन अधिकारी अजित जगताप यांनी दिली.
कारखान्याचा सदर गळीत हंगाम यशस्वीपणे पार पडला आहे. या गळीत हंगामास ऊस पुरवठा करणारे सर्व शेतकरी बांधव, ऊस वाहतूकदार, ऊस तोडणीदार, कंपनीचे सर्व अधिकारी, व कर्मचारी या सर्वांच्या सहकार्याने हा गळीत हंगाम पूर्ण झाला, असे श्री दत्त इंडिया कारखान्याच्या संचालक मंडळाने म्हटले आहे.