दैनिक स्थैर्य | दि. १४ जानेवारी २०२५ | फलटण |
फलटण तालुक्यातील श्री दत्त इंडिया प्रा. लि., साखरवाडी या कारखान्याची एकाच ऊस ट्रॉलीचे दोनदा वजन करून १०२.१६७ मे. टन ऊस कारखान्याला न घालता तो घातल्याच्या नोंदी करण्यास भाग पाडले व उसाचे बिल आणि तोडणी वाहतुकीचे मिळून एकूण ४,२५,०००/-रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी शेतकर्यासह वाहनचालक, वाहनमालक अशा ९ जणांवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद कारखान्यातर्फे सदानंद रघुनाथ पाटील यांनी दिली आहे.
ही फसवणूक दि. ४ डिसेंबर २०२४ ते दि. १४ डिसेंबर २०२४ रोजीदरम्यान श्री दत्त इंडिया प्रा. फलटण, जि. सातारा या कारखान्याच्या वजनकाट्यावर घडली आहे.
- या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये
१. सचिन नबाजी कोकरे, रा. अंदोरी, ता. खंडाळा, जि. सातारा (वाहन मालक)
२. अनिता सचिन होळकर, रा. रुई, ता. खंडाळा, जि. सातारा ( वाहन मालक)
३. राहुल म्हाळसाकांत कोकरे, रा. अंदोरी, ता. खंडाळा, जि. सातारा (वाहन मालक व शेतकरी)
४. जितेंद्र चंद्रकांत भिसे, रा. अंदोरी, ता. खंडाळा, जि. सातारा (वाहन चालक)
५. भाऊसो तात्याबा कोकरे, रा. अंदोरी, ता. खंडाळा, जि. सातारा (वाहन चालक)
६. पांडुरंग विङशनाथ सुतार, रा. अंदोरी, ता. खंडाळा, जि. सातारा (वाहन चालक)
७. सूरज अशोक धायगुडे, रा. अंदोरी, ता. खंडाळा, जि. सातारा (वाहन चालक व शेतकरी)
८. ज्ञानेश्वर महादेव होळकर, रा. रुई, ता. खंडाळा, जि. सातारा (शेतकरी)
९. सचिन महादेव होळकर रा. रुई, ता. खंडाळा, जि. सातारा (वाहन मालक)
यांचा समावेश आहे.
या सर्वजणांनी स्वत:च्या आर्थिक फायद्याकरिता आपसात संगनमत करूनन दिशाभूल व फसवणूक केल्याचे अभिलेख तपासणी पडताळणीमुळे उघड झाले आहे.
या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक एस. डी. महाडिक करत आहेत.