
स्थैर्य, फलटण, दि. १४ ऑक्टोबर : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर, शहरातील श्रीबालाजी सेल्स अँड सर्व्हिसेस या नामांकित किचन अप्लायन्सेस दालनाने आकर्षक ऑफर्सची घोषणा केली आहे. या योजनेमुळे फलटणमधील नागरिकांना आपले स्वयंपाकघर अत्याधुनिक आणि स्मार्ट बनवण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. फेबर, एलिका, सनफ्लेम आणि आयव्हास यांसारख्या दर्जेदार ब्रँड्सच्या उत्पादनांवर मोठ्या सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत.
या ऑफरमधील प्रमुख आकर्षण म्हणजे ‘बीएलडीसी किचन चिमणी’ आहे. अत्याधुनिक बीएलडीसी मोटार तंत्रज्ञानामुळे ही चिमणी कमी आवाज करते आणि कमी वीज वापरते. या मोटारवर तब्बल १५ वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे. ‘फिल्टरलेस’ आणि ‘ऑटो क्लीन’ तंत्रज्ञानामुळे चिमणी स्वच्छ ठेवण्याचा त्रास वाचतो. टच आणि मोशन कंट्रोलसारख्या सुविधांमुळे तिचा वापर अत्यंत सोपा झाला असून, ही चिमणी केवळ १४,४९९ रुपयांपासून उपलब्ध आहे.
चिमणीसोबतच हॉब म्हणजेच गॅस शेगडीवरही विशेष सवलत आहे. काचेच्या टॉपमधील आकर्षक डिझाइनच्या शेगड्या ४,९९९ रुपयांपासून पुढे उपलब्ध आहेत. याशिवाय डिशवॉशर, इलेक्ट्रिक वॉटर हिटर आणि इलेक्ट्रिक शेगडी यांसारखी उपकरणेही सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आली आहेत, ज्यामुळे ग्राहकांना एकाच ठिकाणी स्वयंपाकघरासाठी लागणारी सर्व आधुनिक उपकरणे खरेदी करता येणार आहेत.
उत्पादनांच्या विक्रीबरोबरच ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्यावरही श्रीबालाजी सेल्स अँड सर्व्हिसेसने भर दिला आहे. हॉटेल्स, बंगले आणि फ्लॅट्ससाठी कॉपर गॅस पाईप लाईन बसवून देण्याची सुविधाही येथे उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, ३० ऑक्टोबरपर्यंत खरेदी करणाऱ्या ग्राहकांना फ्री इन्स्टॉलेशन आणि साईट व्हिजिटची सेवा मोफत दिली जाणार आहे, ज्यामुळे ग्राहकांची अतिरिक्त खर्चातून बचत होणार आहे.
आधुनिक जीवनशैलीत स्वयंपाकघरातील कामाचा ताण कमी करण्यासाठी स्मार्ट उपकरणे महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. धूर आणि तेलकटपणा कमी करणारी चिमणी, भांडी धुण्याचा वेळ वाचवणारा डिशवॉशर यांसारख्या उपकरणांमुळे गृहिणींचे श्रम वाचतात आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण होण्यास मदत होते. हीच गरज ओळखून या दिवाळीनिमित्त या ऑफर्स सादर करण्यात आल्याचे दालनाच्या वतीने सांगण्यात आले.
ही दिवाळी ऑफर मर्यादित कालावधीसाठी असून, तिचा लाभ घेण्यासाठी गजानन चौक येथील गोल्डन बेकरीसमोर, तेली गल्ली रोडवरील गजानन हाईट्समधील शॉप नं. ६ येथे असलेल्या ‘श्रीबालाजी सेल्स अँड सर्व्हिसेस’च्या दालनाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ८४२१५६५७१२ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.