स्वच्छ महाराष्ट्र अभियानंतर्गत फलटण येथे श्रमदान स्वच्छता अभियान व जनजागृती रॅली

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २३ डिसेंबर २०२२ । फलटण । स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत फलटण नगरपरिषदेने स्वच्छता श्रमदान अभियान, राबविण्यासाठी प्रत्येक प्रभागात डिसेंबर पासून सुरवात केली असून त्याचाच भाग म्हणून आज सकाळी 7.30 वाजता प्रभाग क्रमांक ५ येथील उंबरेश्वर चौक परिसरामध्ये फलटण नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छता अभियान व श्रमदान राबविण्यात आले.

या अभियानामध्ये महिला आर्थिक विकास व महिला बचतगटांचा तसेच जवळपास 100 नागरिकांचा उस्पुर्त सहभाग होता. श्रमदान स्वच्छताहया अभियानात नगरपरिषदेचे सर्व विभागप्रमुख व अधिकारी कर्मचारी असे २०० कर्मचारी सहभागी झाले होते तसेच नगरपरिषदेकडील 4 घंटागाडी व 3 ट्रॅक्टर १ क्रेन यांचा वापर करणेत आला.अभियाना दरम्यान प्रभागातील नागरिकांना ओला सुका कचरा वर्गीकरण, ओला कचऱ्या पासून घरगुती खत निर्मिती याबाबत प्रात्यक्षिकाद्वारे नागरिकांना माहिती देण्यात आली. घंटागाडी मध्ये येणाऱ्या कचऱ्यावर कशा प्रकारे प्रक्रिया केली जाते. ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत कसे बनवले जाते आणि जे खत बनते ते शेती व बागेसाठी वापरले जाते. तरी नागरिकांनीही घंटागाडीत कचरा वर्गीकरण करून द्यावा अशी जनजागृती करण्यात आली. तसेच, यावेळी आरोग्य विभागातील उत्कृष्ट काम करणारे सफाई मित्र सौ. सुरेखा सत्यवान आहिवळे व सौ. आशा बाळू काकडे नोव्हेंबर महिन्यातील उत्कृष्ट सफाई मित्र म्हणून प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

या अभियाना दरम्यान मुख्याधिकारी यांनी विभाग प्रमुख यांनी उपस्थित नागरिकांसोबत संवाद साधत प्रभागातील रस्ते, पाणी पुरवठा तसेच, शौचालय सबंधित अडचणी समजुन घेऊन त्या सोडविण्यासाठी संबधितांना सूचना दिल्या.

फलटण नगरपरिषदेने येथून पुढील प्रत्येक मंगळवारी व शुक्रवारी हे अभियान राबविण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगितले आहे.


Back to top button
Don`t copy text!