दैनिक स्थैर्य | दि. 02 जानेवारी 2025 | फलटण | शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि मुधोजी महाविद्यालय फलटण यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने स्वच्छता, पर्यावरण व ग्रामीण विकास या घोषवाक्याखाली एक महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे ७ दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबीर, जे दि. ३ ते ९ जानेवारी दरम्यान वडले, ता. फलटण येथे आयोजित केले जाणार आहे.
४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे
फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.
संपर्क : 8888006611 (WhatsApp)
या श्रमसंस्कार शिबीराचे उद्घाटन फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे हस्ते शुक्रवार दि. ३ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता समारंभपूर्वक करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांनी सांभाळणार आहे. शिबीरात १०० स्वयंसेवकांसह महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका, वडले व पंचक्रोशीतील विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत.
या शिबीरामध्ये पाणी प्रश्न, जल व मृद संधारण, जल नियोजन, सांडपाणी व कचरा व्यवस्थापन, वृक्षारोपण यामधून विकास व्हावा हा मुख्य उद्देश आहे. पर्यावरण संवर्धन, अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्रियांचे आरोग्य व आहार, दंतचिकित्सा शिबीर, फळबाग लागवड प्रकल्प व वृक्षसंवर्धन काळाची गरज, व्यसनमुक्ती जनजागृती यासारख्या विविध विषयांवर प्रबोधन होणार आहे. कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. ॲड. ए. के. शिंदे यांनी या सर्व विषयांची माहिती दिली आहे.