दैनिक स्थैर्य । दि. ०४ मार्च २०२२ । म्हसवड । वाकी, ता. माण येथील माणगंगा नदी पात्रात दि. २२ /२/२०२२ रोजी उपविभागीय अधिकारी यांनी गौण खनिज, वाळू उत्खननाप्रकरणी कारवाईसाठी नियुक्त केलेल्या तहसीलदार, तलाठी यांनी एका ट्रॅक्टरवर कारवाई करुन म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी चार तास मंडल अधिकारी शेडे बसले होते. मात्र सहाय्यक पोलीस अधिकारी यांनी तक्रार घेण्यास नकार दिला. याबाबत तहसीलदार यांना या माहिती देण्यासाठी फोन केले. मात्र फोन उचलले तर तलाठी यांनी कारवाई करु नये यासाठी प्रयत्न करुन कामात कसुर केल्याप्रकरणी सातारा जिल्हा अधिकारी यांनी तहसीलदार, चार तलाठी यांना २४ तासाच्या आत समक्ष येवून खुलासा करण्याबाबतची नोटीस देण्यात आल्या होत्या. याची चर्चा जिल्हाभर सुरु असताना आज अचानक नवीन तहसीलदार यांनी माण तालुक्याचा पदभार घेतल्याने तत्कालीन तहसीलदार सुर्यकांत येवले यांचेवर नक्की कारवाई काय झाली ? बदली झाली, सक्तीच्या रजेवर पाठवले कि निलंबित केले हे मात्र समजू शकले नाही
याबाबत मिळालेली माहिती दि. २२/२/२०२२ रोजी रात्री १.२० च्या दरम्यान वाकी माणगंगा नदी पात्रात चार तलाठी व मंडलअधिकारी शेंडे यांच्या भरारी पथकाने एका ट्रॅक्टर वर जप्तीची कारवाई करून दि. २३/२/२०२२ रोजी सांयकाळी ६.३० ते ९.०५ पर्यंत मंडल अधिकारी शेंडे म्हसवड पोलीस ठाण्यात आणला. मात्र म्हसवड पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी तक्रार घेण्यास नकार दिला. या बाबत तहसीलदार यांना फोन करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी चार तासात एकदाही फोन उचलला नाही तर दुसरीकडे तलाठी यांनी कारवाई करु नये यासाठी प्रयत्न केले. याबाबतचे व्हीडीओ व ओडिओ संभाषण सर्व ग्रुपवर व्हायरल झाले. व्हायरल झालेले व्हीडीओ व ओडिओ बाबत जिल्हाधिकारी यांनी या घटनेतील मंडल अधिकारी यांना सातारा येथे बोलवून माहिती घेतली व संबधित प्रांताधिकारी, तहसीलदार, चार तलाठी यांना जिल्हाधिकार शेखरसिंग यांनी २४ तासाच्या आत समक्ष येवून खुलासा देण्यासंबधी कारणे दाखवा नोटीस २४/२/२०२२रोजी काढली होती. याबाबत जिल्ह्याभर या कारवाईची चर्चा सुरू असताना आज अचानक माणचे तहसीलदार तहसीलदार सुर्यकांत येवले यांचे जागी नव्याने पदभार घेतलेले रिचर्ड यानथन हजर झाले.
यामुळे तहसीलदार सुर्यकांत येवले व तलाठी यांचेवर नकी कारवाई काय झाली बदली झाली, निलंबित केले कि सक्तीच्या रजेवर पाठवले नक्की कारवाई काय याबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे.