शॉपिफायची युट्यूबसह भागीदारी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २० जुलै २०२२ । मुंबई । व्यापारासाठी अत्यावश्यक असणा-या इंटरनेट सुविधा पुरविणारी अग्रगण्य कंपनी शॉपिफायने आज जगभरातील आपल्या लक्षावधी व्यापा-यांना यूट्यूब शॉपिंगचा मंच उपलब्ध करून दिला. यामुळे आपल्या ग्राहकांशी जोडले जाण्यासाठी विश्वासार्ह, दर्जेदार कन्टेन्टचा वापर करणा-या क्रिएटर्सना आपला ब्रॅण्ड उभारण्याचा आणि आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्याचा एक नवा उत्तम मार्ग खुला झाला आहे.

कन्टेन्ट क्रिएटर्स आणि व्यापा-यांकडे यूट्यूबच्या मंचावरून प्रेक्षकांपर्यंत थेट पोहोचण्याची क्षमता असते, जिचा वापर करून ते प्रेक्षकांच्या मनाची पकड घेणारा खरेदीचा अनुभव निर्माण करू शकतात व हे करताना आपल्या व्यापारातून अधिक पैसा प्राप्त करू शकतात आणि आपल्या व्यवसायाची यशस्वीपणे उभारणी करू शकतात.

शॉपिफायच्या डायरेक्टर आणि कंट्री हेड फॉर इंडिया भारती बालकृष्णन म्हणाल्या, “ग्राहक जिथे वेळ घालवतात तिथे पैसे खर्च करतात आणि शॉपिफायने युट्यूबशी केलेल्या भागीदारीमुळे भारतीय व्यापा-यांना नवीन व मनोवेधक व्हिडिओ कन्टेन्टच्या साथीने इथल्या आणि जगभरातल्या ग्राहकवर्गापर्यंत पोहोचण्याचा एक नवीन मार्ग खुला झाला आहे. युट्यूब हा भारतातील काही सर्वात प्रभावशाली चॅनल्सपैकी एक आहे आणि शॉपिफायबरोबर एकत्रीकरण झाल्याने भारतातील स्वतंत्र ब्रॅण्ड्ससाठी संधी नेहमी कशी मिळते याची व्याख्याच मूळापासून बदलून जाणार आहे. युट्यूबवर डी२सी कॉमर्सच्या मर्यादा विस्तारण्यासाठी गुगलबरोबर दीर्घकालीन भागीदारी करण्यास आम्ही अत्यंत उत्सुक आहोत.”

शॉपिफाय व्यापा-यांना यूट्यूब लाइव्ह, शॉर्टस् आणि व्हीओडी कन्टेन्टच्या माध्यमतून शॉपिफाय स्टोअर्समधील आपली उत्पादने युट्यूबच्या दोनशे कोटी मासिक यूजर्सना विकण्याचा पर्याय पुढील तीन मार्गांनी निवडता येईल:

  • लाइव्ह स्ट्रीम्स: मर्चंट्सना लाइव्हस्ट्रीम व पिक्चर इन पिक्चर प्लेबॅकच्या दरम्यान प्रमुख जागांना आपली उत्पादने टॅग किंवा पिन करता येतील म्हणजे ग्राहकांना चेकआउट करताना पाहता येतील.
  • व्हिडिओज: मर्चंट्सना ऑन-डिमान्ड व्हिडिओंच्या खाली एका प्रोडक्ट शेल्फमध्ये निवडलेल्या उत्पादनांची यादी दाखवता येईल.
  • स्टोअर टॅब: मर्चंट्सच्या युट्यूब चॅनेलला एक नवा टॅब जोडला जाईल, ज्यात त्यांच्या सर्व उत्पादनांची संपूर्ण श्रेणी असेल.

शॉपिफाय उत्पादनांचे सिंकिंग करून त्यांनी नावे, प्रतिमा, किंमती असे सर्व तपशील अद्ययावत राखत आणि विविध चॅलन्सच्या माध्यमातून त्यांची विनाअडथळा वाहतुक करत मर्चंट्सच्या रिटेल ऑपरेटिंग यंत्रणेला बळ देते. जर एखादे उत्पादन पूर्णपणे विकले गेले असेल तर ते युट्यूबवरून आपोआपच काढून टाकले जाते. याशिवाय मर्चंट्सना आपल्या शॉपिफाय व्यवस्थापनाकडून आपले लाइव्ह आणि ऑन-डिमान्ड व्हिडिओज कशी कामगिरी करत आहेत याचाही मागोवा घेता येतो, ज्यात त्यांना विविध माध्यमांमध्ये सुरू असलेल्या विक्रीचेही संपूर्ण चित्र मिळते.

युट्यूबचे व्हीपी ऑफ शॉपिंग प्रोडक्ट डेव्हिड कार्टझ म्हणाले, “अनेक वर्षांपासून क्रिएटर्स आपल्या युट्यूब कन्टेन्टच्या आधाराने आपल्या व्यवसायाची उभारणी करत आले आहेत, व हे करताना ते बरेचदा आपल्या उद्योजकतेचा विस्तर करताना स्वत:चा ब्रॅण्डही त्यांनी उभा केला आहे. मात्र थेट युट्यूबवरून आपल्या प्रेक्षकांपर्यंत विनासायास पोहोचणे आजवर इतके सोपे नव्हते. यासंदर्भात शॉपिफायबरोबरच्या भागीदारीबद्दल आम्ही अत्यंत उत्साही आहोत, कारण आता क्रिएटर्सना त्यांची स्टोअर्स युट्यूबवरील त्यांच्या कम्युनिटींपर्यंत अधिक ठळकपणे नेता येणार आहेत. यामुळे ग्राहक अधिकाधिक प्रमाणात खरेदीकडे वळत आहेत.”


Back to top button
Don`t copy text!