पालखी सोहळ्याच्या ठिकाणी ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने चित्रीकरणास मनाई


दैनिक स्थैर्य । दि. २४ जून २०२२ । सातारा । संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा पायी पालखी सोहळा दिनांक 28 जून 2022   ते दि. 04 जुलै 2022 रोजी सातारा जिल्ह्यातील पाडेगांव फार्म निरा नदी  येथे आगमन  होऊन   लोणंद, चांदोबाचा लिंब, तरडगाव, काळज, निंभोरे. वडजल, फलटण, विडणी, पिंपरद, निबळक फाटा, बरड व साधुबुवाचा ओढा या मार्गे सकाळचा विसावा, दुपारचे भोजन, दुपारचा विसावा व मुक्काम घेत मार्गक्रमण करणार आहे. या पालखी सोहळ्याच्या ठिकाणी ड्रोन कॅमे-याच्या सहाय्याने चित्रीकरणास  खाजगी दूरचित्रवाहिन्या, खाजगी व्यक्ती, संस्था यांना जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 मधील तरतुदी नुसार प्राप्त अधिकारानुसार  दिनांक 27 जून 2022 रोजीचे 00.00 वाजलेपासून ते दि. 04 जुलै 2022 रोजीचे 24.00  वाजेपर्यंतच्या कालावधीत मनाई करीत आहे.


Back to top button
Don`t copy text!