दैनिक स्थैर्य । दि. २५ सप्टेंबर २०२२ । सतारा । शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या सेमिनार विभागाने नुकततेच २४ ऑगस्ट २०२२ रोजी शिवाजी विद्यापीठ संलग्न महाविद्यालयीन नियतकालिक स्पर्धेचे २०१८-१९ व २०१९-२० या शैक्षणिक वर्षाचे निकाल जाहीर केले.यातील २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील नियतकालिक स्पर्धेत छत्रपती शिवाजी कॉलेजच्या’शिवविजय‘या नियतकालिकाने विद्यापीठात द्वितीय क्रमांक मिळविला. या महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांनी ‘शिवविजय २०१९-२० ‘नियतकालिकाचे संपादक म्हणून काम केले होते. या यशाबद्दल शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.पी.एस.पाटील व कुलसचिव प्रा.डॉ.व्ही.एन.शिंदे यांचे हस्ते सन्मानचिन्ह व पुरस्कार प्रमाणपत्र देऊन महाविद्यालयाचा गौरव करण्यात आला. प्रा.डॉ.सुभाष वाघमारे व संपादन समितीतील, डॉ.संजयकुमार सरगडे यांनी पुरस्कार स्वीकारला. पारितोषिक वितरण बैठकीत उपस्थित प्राचार्य, संपादक प्रतिनिधी यांच्यापुढे प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांनी विद्यापीठाने दोन्ही सत्र पूर्ण झाल्यानंतर एक ते दोड महिन्याचा वेळ देऊन नियतकालिके मागवावीत अशी सूचना केली. तसेच पुरस्कार प्रमाणपत्रात नियतकालिकाचे नाव, संपादक यांचे नाव यांचा समावेश असावा ही देखील सूचना केली .व या सूचनांची दखल घेऊन शिवाजी विद्यापीठ क्षेत्रातील सर्वच महाविद्यालयात नियतकालिके निघावीत व ती स्पर्धेत सहभागी व्हावीत तरच विविध ठिकाणी असलेल्या विद्यार्थ्यांच्या साहित्य लेख्ननादी विविध कलांना न्याय मिळेल असे मत प्र.कुलगुरू डॉ.पी.एस. पाटील यांनी व्यक्त केले व विद्यापीठ या वर्षात ज्या महाविद्यालयात नियतकालिक छापली जात नाहीत त्यांना नियतकालिक काढण्यासाठी आवाहन करून पाठपुरावा करेल असे सांगितले. संपादन मंडळातील डॉ.कांचन नलवडे, डॉ.सादिक तांबोळी, डॉ.रोशनआरा शेख,डॉ.पोर्णिमा मोटे, प्रा.विजया गणमुखी, डॉ.सुरेश झोडगे, डॉ.संजयकुमार सरगडे ,प्रा.ए.के जगताप,प्रा.उषादेवी घाडगे ,प्रा.साधना पाटील,प्रा.दीपक कवठेकर , वैभव शेडगे, दिलीप हंकारे ,दशरथ रणदिवे,प्रिंट ओम ऑफसेटचे संदेश शहा,जतीन शहा ,प्रशांत गुजर,कृष्णा चिंचकर व सहभागी लेखक विद्यार्थी यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर यांनी अभिनंदन केले.. शिवविजय अंकाचे पूर्वीचे संपादक डॉ.शिवाजी पाटील, व रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे यांनी संपादक मंडळाचे अभिनंदन केले.शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचे अध्यक्ष डॉ.प्रकाश दुकळे व संघटना सदस्यांनी या यशाबद्दल अभिनंदन केले.