
दैनिक स्थैर्य । 7 एप्रिल 2025। फलटण । पिंपरी चिंचवड येथील ग्रीव्हज समूह कामगार सहकारी पतपेढी, लि. चिंचवड या पतपेढीच्या संचालकपदी म्हणून फलटण लोकसेवा संघाचे शिवराज दादासो शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
ग्रीव्हज समूह कामगार सहकारी पतपेढी ही पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरीत गेली 69 वर्ष कार्यरत आहे. कामगारांची अर्थवाहिनी म्हणून ओळखली जाते. या पतपेढीची सन 2025 ते सन 2030 या कालावधी करता संचालक मंडळ निवडणूक जाहीर करण्यात आली.
या निवडणुकीमध्ये फलटण लोकसेवा संघाचे अध्यक्ष शिवराज दादासो शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. शिवराज शिंदे यांनी हे फलटण तालुक्यातील ग्रामीण भागातून पिंपरी चिंचवडच्या औद्योगिक नगरीत गेले. तेथे त्यांनी अनेकांना मदतीचे हात दिला. तसेच प्रत्येकाच्या अडीअडचणीसाठी मदत केली. निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी पी. एन. राऊत यांनी कामकाज पाहिले.
याबद्दल शिवराज शिंदे यांचा विधान परिषदेचे माजी सभापती, आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पुढील कामकाजामध्ये सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी दिले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी शुभेच्छा व्यक्त करून शिवराज शिंदे यांच्या सामाजिक कार्यासाठी तसेच ते राबवत असलेल्या लोकोपयोगी उपक्रमांनाही शुभेच्छा दिल्या.
श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ.बाळासाहेब शेंडे, महात्मा फुले एज्युकेशन सोसायटी, श्री उत्तरेश्वर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज विडणीचे विश्वस्त कमिटी, श्रीमंत रामराजे प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य आणि फलटण लोकसेवक संघ, पिंपरी चिंचवड यांच्यातर्फेदेखील सन्मान करण्यात आला.