फलटणमध्ये शिवजयंती मोठ्या थाटामाटात संपन्न होणार : श्रीमंत संजीवराजे


दैनिक स्थैर्य । दि. २२ एप्रिल २०२२ । फलटण । यंदाचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जंयती महोत्सव सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित करून मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आहे, अशी माहिती सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा श्रीमंत मालोजीराजे सहकारी बॅंकेचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.

महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या “लक्ष्मी विलास” या निवासस्थानी आयोजित केलेल्या बैठकीमध्ये श्रीमंत संजीवराजे बोलत होते.

यावेळी बोलताना श्रीमंत संजीवराजे म्हणाले की, फलटण तालुक्यामध्ये शिवजयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याच्या दृष्टीने शहरातील व तालुक्यातील सर्वच जण पुढे आले आहेत. त्यामुळे यंदाचा शिवजयंती महोत्सव या सर्वांना एकत्रित बरोबर घेऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यापूर्वी दोन वेळा फलटण नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष कै. नंदकुमार भोईटे यांनी सर्वांना बरोबर घेऊन हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला तीच परंपरा पुढे नेण्यासाठी फलटणमधील अनेक युवकांनी श्रीमंत रामराजे, श्रीमंत रघुनाथराजे व माझ्याकडे शिवजयंती महोत्सवाची महत्वाची परंपरा पुढे नेण्यासाठी आग्रह धरला आणि म्हणूनच सर्वांना बरोबर घेऊन तसेच सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित करून एक आगळा वेगळा शिवजयंती महोत्सव साजरा करणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जंयती उत्सव हा राजकारण विरहित व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर प्रेम व्यक्त करणारा व त्यांचे विचार पुढे नेहणारा आहे, असेही श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!