शिवछत्रपती पुरस्कार विजेते अशोक दुधारेवरही गुन्हा दाखल, नाशिक शहरातील क्रीडा क्षेत्राच एकच खळबळ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, नाशिक, दि.९: सेपक टकरा संघटनेच्या बोगस क्रीडा प्रमाणपत्र वाटप प्रकरणी कुणाल आहिरे नंतर संघटेनेचे कार्यकारिणी सदस्य तसेच शिवछत्रपती पुरस्कार विजेते अशोक दुधारेवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोगस क्रीडा प्रमाणपत्राप्रकरणी सलग दुसरा गुन्हा दुधारेवर दाखल झाल्याने शहरातील क्रीडा क्षेत्रात एकच खळबळ निर्माण झाली आहे.

राज्यभरात गाजत असलेल्या बोगस क्रीडा प्रमाणपत्रा प्रकरणी शहरातील नाशिक जिल्हा सेपक टकरा संघटनेचा कथित सचिव कुणाल आहिरेला काही दिवसांपूर्वी हिंजवडी पोलिसांनी अटक केली हाेती. या प्रमाणपत्र वाटप प्रकरणात संघटनेच्या कार्यकारिणी सदस्य दुधारे यांच्याही सहभाग असल्याचे पाेलिस तपासात निष्पन्न झाले आहे. याचमुळे हिंजवडी पोलिस ठाण्यात दुधारे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान राज्यकर विभागातील निरीक्षक पदाची नोकरी मिळविण्यासाठी सरकारी कार्यालयात एका खेळाडूने बनावट प्रमाणपत्रे देत फसवणूक केल्याप्रकरणी तलवारबाजी महासंघाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष दुधारे यांच्या विरोधात पुण्याच्याच येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. हे प्रकरण ताजे असतांना सेपक टकरा संघटनेच्या प्रकरणात देखील सलग दुसरा गुन्हा दाखल दुधारेवर दाखल झाला आहे.

ते खेळाडू देखील पोलिसांच्या रडारवर

सेपक टकरा संघटनेच्या माध्यमातून बोगस क्रीडा प्रमाणपत्र घेवून शासकीय नोकरी मिळविणारे पोलिसांच्या रडारवरआहे.लवकरच्या विराेधात कारवाई केली जाणार असल्याची माहिती पाेलिस अधिकाऱ्यांनी दिली.

दुधारेचा सहभाग असल्याचे निष्पन्न

बोगस क्रीडाप्रमाणपत्र प्रकरणाच्या तपासात अशोक दुधारे यांच्याही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहेत. त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पुढील तपास सुरु आहे.-उध्दव खाडे, सहायक पाेलिस निरीक्षक, हिंजवडी पाेलिस ठाणे

याबाबत माहिती घेतो

बोगस क्रीडाप्रमाणपत्राच्या गुन्ह्यात माझेही नाव टाकण्यात आल्याचे समजले आहे. याबाबत माहिती घेतो. – अशोक दुधारे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते


Back to top button
Don`t copy text!