शिवम प्रतिष्ठानच्यावतीने घारेवाडीत शनिवारपासून शौर्यवर्धिनी सखी हृदय संमेलनाचे आयोजन


स्थैर्य, सातारा, दि. 9 सप्टेंबर : शिवम प्रतिष्ठानच्या वतीने घारेवाडी (ता. कर्‍हाड) येथे 14 व्या शौर्यवर्धिनी सखी हृदय संमेलनाला शनिवारपासून (दि. 13) रविवारी (दि. 14) प्रारंभ होत आहे. दोन दिवसांच्या संमेलनात विविध प्रेरणादायी वक्त्यांचे मार्गदर्शन होणार आहे. महिलांचा सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास हाच शिबिराचा मुख्य उद्देश असून, शिबिरात सहभागाचे आवाहन संयोजकांनी केले आहे.समाजातील महिलांनी स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनावे. परंपरेला आधुनिकतेची जोड देऊन समाजकार्यात सहभाग वाढवावा. स्वतःची आणिसमाजाची प्रगती त्यातून साधावी, यासह दोन दिवसांचे हक्काचे माहेरपण अनुभवण्यासाठी प्रतिवर्षी घारेवाडीचे शिवम प्रतिष्ठान प्रतिवर्षी शौर्यवर्धिनी सखी हृदय संमेलन भरवते. राज्याच्या कानाकोपर्‍यांतून महिला संमेलनात येतात. विचाराची देवाण-घेवाण करतात.

प्रेरणादायी व्याख्यानातून भविष्याची वाटचाल यशस्वी ठेवतात. शिबिराचे यंदा 14 वे वर्ष आहे. कणकवली येथील सिव्हिल सर्जन सुप्रिया देशमुख- देसाई व डॉ. माधवी सावंत यांच्या हस्ते शनिवारी शिबिराचे उद्घाटन होईल. यावेळी ’तू चाल पुढे’या विषयावर व्याख्यान होईल. त्यानंतर योगोपचार तज्ज्ञ श्रद्धा पाटील व्यास यांचे ’स्वामी विवेकानंद – एक प्रतिभावंत व्यक्तिमत्त्व’ या विषयावर व्याख्यान होईल.

दुपारच्या सत्रात सोलापूर महापालिकेतील माऊली अडकूर यांचे ’संघर्ष अस्तित्वाचा’ या विषयावर व्याख्यान होईल. सांगलीच्या सी. बी. शाह महिला महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. सुनीता बोर्डे-खडसे यांचे ’स्त्री सक्षमीकरणाची प्रेरणा व भूमिका’ या विषयावर व्याख्यान होईल. आदिशक्ती महिला ग्रुपच्या संगीता शिंदे यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने पहिल्या दिवसाची सांगता होईल. निसर्ग भ्रमंतीने रविवारी पहिल्या सत्राला प्रारंभहोईल. नांदगाव येथील मंगल आवळे या ’आयुष्याचा गिअर बदलताना’ या विषयावर व्याख्यान देतील. पुणेच्या सिर्फ फाउंडेशनच्या संस्थापक सुमेधा चिथडे यांचे ’सियाचिन ऑक्सिजन प्लांट उभारणी’ या विषयावर व्याख्यान होईल. त्यानंतर प्रतिष्ठानचे संस्थापक इंद्रजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाने संमेलनाची सांगता होईल. कृष्णा हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरच्या वतीने संमेलनातील सहभागी महिलांसाठी स्त्री आरोग्य व कॅन्सर मोफत तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे.


Back to top button
Don`t copy text!