जिल्हास्तरीय सुब्रोतो फुटबॉल स्पर्धेत शिवाजीराजे इंग्लिश स्कूलचा संघ विजयी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २३ जुलै २०२२ । सातारा । जिल्हा परिषद व जिल्हा क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि. १९ जुलै ते गुरुवार दि. २१ जुलै रोजी संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय सुब्रोतो चषक फुटबॉल स्पर्धेमध्ये १७ वर्षाखालील वयोगटांमध्ये फलटण एज्युकेशन सोसायटी चे श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल (CBSC) च्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

स्पर्धेतील पहिला सामना KTC कृष्णा स्कूल मलकापूर कराड यांच्या विरुद्ध झाला. हा सामना ३ – ० गोल ने जिंकून स्पर्धेच्या उपांत्य पूर्व फेरीत प्रवेश केला. या सामन्यात सागर कुमार सिंग, राजवीर मांढरे व अमोघ भोसले यांनी उत्कृष्ट गोल केले.

स्पर्धेतील उपांत्य सामना K.S.D शानबाग सातारा यांच्या विरुद्ध झाला हा सामना खूप अति तटीने खेळण्यात आला. हा सामना १ – ० जिंकून स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. या सामन्यात निर्णय गोल सागर कुमार सिंग याने केला.

स्पर्धेतील अंतिम सामना पोदार इंटरनॅशनल स्कूल सातारा बरोबरचा अतिशय चुरशीने खेळण्यात आला. या सामन्यांमध्ये पूर्ण वेळेत सामना १ -१ बरोबरीत सुटल्यामुळे हा सामना येणार ती शूटआउट वर घेण्यात आला. पेनल्टी शूटआउट मध्ये अमोघ भोसले, अभिषेक फडतरे, सागर कुमार सिंग यांनी निर्णय गोल नोंदवले.

अंतिम सामना ३ – ० ने जिंकून सामन्याचे विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत हर्ष निंबाळकर याने गोलकीपर म्हणून उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून गोल वाचवले. या विजयी संघाला संजय फडतरे व अमित काळे यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशस्वी खेळाडूंना व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना सातारा जिल्ह्याचे नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, फलटण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत मालोजीराजे सहकारी बॅंकेचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण क्रीडा समितीचे चेअरमन शिवाजीराव घोरपडे, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी अरविंद निकम, अधीक्षक श्रीकांत फडतरे, युवा उद्योजक तुषारभैय्या नाईक निंबाळकर , क्रीडा सचिव सचिन धुमाळ, क्रीडा समितीचे सर्व सदस्य, श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल (CBSC) प्राचार्या सौ. दिक्षीत यासोबतच मागदर्शक शिक्षक यांनी यशस्वी खेळाडूचे अभिनंदन केले.


Back to top button
Don`t copy text!