मुधोजी महाविद्यालयाच्या उदय नियतकालिकेस शिवाजी विद्यापीठाचे पारितोषिक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २५ सप्टेंबर २०२२ । फलटण । मुधोजी महाविद्यालयामार्फत प्रकाशित करण्यात येणारे उदय हे नियतकालिक म्हणजे मुधोजी महाविद्यालयाचा आरसा असतो असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्र. कुलगुरू प्रोफेसर डॉ. पी. एस. पाटील यांनी केले.

मुधोजी महाविद्यालयाचे उदय नियतकालिकेस शिवाजी विद्यापीठाचे पारितोषिक प्राप्त झाले. या समारंभाच्या वेळी प्र. कुलगुरू बोलत होते. या सोहळ्यासाठी कुलसचिव शिंदे तसेच उपकुल सचिव डॉ. प्रमोद पांडव विशेष कक्ष तसेच विविध व्यावसायिक व बिगर व्यावसायिक गटातील पारितोषिक प्राप्त महाविद्यालयाचे प्राचार्य व संपादक या कार्यक्रमास उपस्थित होते.

मुधोजी महाविद्यालयाच्या उदय वार्षिक अंकास सन 2019- 20 या वर्षाकरिताचा तृतीय क्रमांक प्राप्त झालेला असून हे पारितोषिक स्वीकारण्यासाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी.एच. कदम व उदय अंकाचे संपादक प्रा. लक्ष्मीकांत बेळेकर कार्यक्रमास उपस्थित होते.

उदय अंकास तृतीय क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल फिरता चषक व प्रशस्तीपत्र देऊन विद्यापीठातर्फे गौरविण्यात आले. याप्रसंगी संपादक लक्ष्मीकांत बेळेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.


Back to top button
Don`t copy text!