
दैनिक स्थैर्य । 19 मार्च 2025। सातारा । येथील शिवाजी उदय मंडळाच्या टेबल टेनिस विभागाच्या वतीने येत्या शनिवार दि. 22 व रविवार दि. 23 मार्च रोजी खुल्या टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संयोजक मनीषा सरदेशमुख यांनी दिली.
मुले व मुली यांच्या टेबल टेनिसच्या एकेरी स्पर्धा 9,11,13,15 व 17 वयोगटा खालील स्पर्धकांमध्ये घेण्यात येणार आहेत. त्यासाठी इच्छुक स्पर्धकांनी येत्या 21 मार्च पर्यंत शिवाजी उदय मंडळ येथे संपर्क साधून नावे नोंदवावीत असे आव्हान संयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे.