‘शिवरायांना अभिवादन, समतेचा संदेश’ – भारतीय बौद्ध महासभेकडून जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण


छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भारतीय बौद्ध महासभा, फलटण शाखेकडून पुतळ्यास पुष्पहार अर्पण. BSI मिशन 25 अंतर्गत महापुरुषांना अभिवादन उपक्रम.

स्थैर्य, फलटण, दि. २० फेब्रुवारी : छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भारतीय बौद्ध महासभा, फलटण तालुका शाखा यांच्या वतीने त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

महाराष्ट्र व केंद्रीय कार्यकारिणीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘BSI मिशन 25’ अंतर्गत सर्व महापुरुष व महामातांना अभिवादन करण्याचा उपक्रम सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

यावेळी तालुका कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करत स्वराज्य, समता, न्याय आणि स्वाभिमान ही मूल्ये आजही समाजासाठी मार्गदर्शक ठरत असल्याचे नमूद केले. “शिवरायांच्या विचारांची अंमलबजावणी करून सामाजिक न्याय व बंधुतेचा संदेश देणे हीच खरी आदरांजली,” अशी भावना व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमास आयु. महावीर भालेराव, आयु. बाबासाहेब जगताप, आयु. बजरंग गायकवाड, आयु. आनंद जगताप, आयु. स्वप्निल गायकवाड, आयु. चंद्रकांत मोहिते आदी पदाधिकारी उपस्थित होते.

१९ फेब्रुवारी १६३० रोजी जन्मलेल्या शिवाजी महाराजांची यंदा ३९६ वी जयंती साजरी होत आहे. मराठा साम्राज्याचे संस्थापक म्हणून ओळखले जाणारे शिवाजी महाराज हे शूर, दूरदर्शी आणि लोककल्याणकारी शासक होते. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत समाजात समतेचा संदेश दृढ करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.


Back to top button
Don`t copy text!