किल्ले प्रतापगडावर 366 मशालींचा ’शिव’प्रकाश

शिवभक्तांच्या घोषणांनी गगन दुमदुमले


स्थैर्य, सातारा, दि. 29 सप्टेंबर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदीप्यमान पराक्रमाची साक्ष देणारा आणि हिंदवी स्वराज्याचा महत्त्वाचा आधारस्तंभ असलेला किल्ले प्रतापगड शनिवारी रात्री एका अभूतपूर्व उत्साहात न्हाऊन निघाला . आई भवानी मातेच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेला 366 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या मशाल महोत्सवात सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील किल्ले प्रताप गडावर शिवभक्तांकडुन 366 मशाली प्रज्वलित करन्यात आल्या आणि या शिवसोहळ्याला हजारोंच्या संख्येने शिवभक्त साक्षीदार झाले. तळकोकणातून मोठ्या संख्येने शिवप्रेमी या उत्सवात सहभागी होण्यासाठी गडावर दाखल झाले होते ज्या मुळे शिवभक्तांचा उत्साह गगनाला भिडला होता!

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. यात किल्ले प्रतापगड हा स्वराज्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला. याच गडावर झालेली अफजल खान वधाची लढाई इतिहासात आजही अजरामर आहे. छ.शिवाजी महाराजांनी नेपाळच्या गंडकी नदी मधील शाळिग्राम दगड मागवून त्या पासून आई भवानी मातेची मूर्ती बनवून घेवून किल्ले प्रतापगडावर स्थापन केली आहे . या ऐतिहासिक घटनेला 350 वर्षे पूर्ण झाल्यावर 350 मशाली प्रज्वलित करून नवरात्रौत्सव चतुर्थीच्या दिवशी मशाल महोत्सवाची परंपरा सुरू करण्यात आली . यंदा या मशाल महोत्सवाचे हे 16 वे वर्ष असून, 2010 सालापासून सुरू झालेल्या या परंपरेचे आयोजन यंदा नवरात्रौत्सवातील शष्ठीच्या दिवशी करण्यात आले होते.

प्रतापगडचे चंद्रकांत आप्पा उतेकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या सोहळ्यात , मान्यवरांच्या हस्ते आई भवानी मातेच्या साक्षिने मशाल प्रज्वलित करून मशाल महोत्सवाच्या कार्यक्रमाची शानदार सुरुवात झाली. स्वराज्य ढोल पथका’च्या गजरात प्रज्वलित केलेल्या 366 मशालींच्या लखलखत्या प्रकाशाने आंणि फटाक्यांच्या आतषबाजीने संपूर्ण किल्ला उजळून निघाला. रात्रीच्या काळोखात मशालींचा ’शिव’प्रकाश आणि शिवभक्तांचा उत्स्फूर्त ’जय भवानी जय शिवाजी’ या जयघोषा मुळे संपूर्ण प्रतापगड किल्ला दुमदुमला होता. या अविस्मरणीय सोहळ्याने शिवभक्तांना महाराजांच्या पराक्रमाची आणि आई भवानी मातेच्या शक्तीची पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणीव / प्रचीती करून दिली.

366 वर्ष पूर्ण झाले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या हिंदवी स्वराज्य स्थापनेतील किल्ले प्रतापगडचे महत्त्व मोठे आहे. महाराजांनी अफजलखानाचा वध किल्ले प्रतापगडावर केल्यामुळे महाराजांचे शौर्य इतिहासात अजरामर झाले. महाराजांनी नेपाळच्या गंडकी नदीमधील दगड मागवून त्यापासून आई भवानीमातेची मूर्ती करवून घेतली. मूर्ती प्राणप्रतिष्ठापना झालेल्या दिवसाला 366 वर्ष पूर्ण झाले.


Back to top button
Don`t copy text!