प्रदीप झणझणे भाजपात

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 03 ऑक्टोबर 2024 | फलटण | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे फलटण तालुका प्रमुख प्रदीप झणझणे यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघात “आमदार बदलायाचाय” हा ट्रेंड प्रदीप झणझणे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल केला होता. याच प्राश्वभूमीवर प्रदीप झणझणे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

सुरवडी येथील हॉटेल निसर्ग येथे आयोजित कार्यक्रमात प्रदीप झणझणे यांचा प्रवेश माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी जेष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे – पाटील, भाजपा फलटण विधानसभा प्रमुख सचिन कांबळे – पाटील, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर, पंचायत समितीचे माजी सदस्य धनंजय साळुंखे – पाटील, राजेंद्र काकडे, विकारांत झणझणे, विशाल नलवडे यांच्यासह विविध कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिती होती.

फलटण तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी विशेतः ग्रामीण भागातील लोकांसाठी प्रदीप झणझणे हे कामकाज करीत आहेत. त्यांनी शेतकऱ्यांच्या डीपीचे विविध प्रश्न मार्गी लावले आहेत. शेतकरी, शेतमजूर यांच्यासाठी लढणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची तालुक्यात ओळख आहे.

फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काहीही झाले तरी रबर स्टॅम्प आमदार बदलाचा आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात आगामी काळामध्ये फलटण तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कार्यरत राहणार असल्याची ग्वाही यावेळी प्रदीप झणझणे यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!