शिवसेनेची सातारा जिल्हा बँकेत मुसंडी; शेखर गोरे यांचा फलटण तालुका शिवसेनेच्यावतीने सत्कार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २४ नोव्हेंबर २०२१ । फलटण । सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत माण खटावचे शिवसेना नेते शेखर गोरे यांनी विरोधी उमेदवाराविरोधात तब्बल 36 मते घेतली. दोन्ही उमेदवारांना समसमान मते मिळाल्यामुळे ईश्वरी चिठ्ठी टाकण्यात आली. पण तिथेही शेखर गोरे यांच्या नावाची निवड होऊन शेखर गोरे विजयी झाले. शेखर गोरे यांना मिळालेली 36 मते हीच मुळात त्यांची नेत्रदीपक कामगिरी असुन यातच त्यांचा खुप मोठा विजय झालेला आहे. प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेने प्रथमच जोरदार मुसंडी मारली आहे. माण-खटावमधुन शेखर गोरे व कोरेगावमधुन सुनिल खत्री यांच्या विजयाने शिवसेनेचे दोन वाघ सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत संचालक पदी विराजमान झाले असल्याचे शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी यावेळी स्पष्ट केले.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत दमदार विजय मिळवून संचालक पदी निवड झालेबद्दल माण – खटावचे शिवसेना नेते शेखर गोरे यांचा फलटण तालुका शिवसेनेच्यावतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे, शिवसेना विभाग प्रमुख किसन यादव, ग्राहक संरक्षण कक्षाचे उपजिल्हा प्रमुख शैलेश नलवडे, माथाडी कामगार तालुका प्रमुख नंदकुमार काकडे यांच्यासह फलटण तालुक्यातील शिवसैनिक उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!