स्थैर्य,बीड, दि.१८: बीड मतदार संघातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत 29 पैकी 23 ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे वर्चस्व सिद्ध झाले होते. सरपंच उपसरपंच पदाच्या निवडीत विरोधकांनी काही ग्रामपंचायत वर आपलाच दावा केलेला असतानाच आज दुसऱ्या दिवशी 15 पैकी 10 ग्रामपंचायती मध्ये शिवसेनेचे सरपंच उपसरपंच निवडले गेले आहेत.
काल पहिल्या दिवशी सरपंच उपसरपंच पदाच्या निवडीत 14 पैकी 9 ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे सरपंच उपसरपंच निवडून आले. तर आज दुसऱ्या दिवशी 15 पैकी 10 ग्रामपंचायतींवर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे वर्चस्व सिद्ध झाले आहे.
ब्रह्मगाव वैष्णवी संदीप डावकर सरपंच पदी तर उपसरपंच पदी बिडवे संतोष पोखरी (मैदा) सरपंच अर्चना चंद्रकांत करांडे तर उपसरपंच कमलबाई बाळकृष्ण राठोड, माळसापुर सरपंचपदी शीतल लहू खांडे तर उपसरपंचपदी सुमंत राजेंद्र राऊत मानेवाडी सरपंच पदी सोनाली प्रदीप माने तर उपसरपंचपदी सुखदेव चांगदेव माने तर कोळवाडी ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदी द्रौपदी अंकुश वाघमारे तर उपसरपंचपदी प्रियांका तुळशीराम शिंदे यांची निवड झाली आहे गुंधा वाडी येथील सरपंच पद रिक्त असून उपसरपंचपदी सविता नवनाथ माने यांची निवड करण्यात आली आहे वंजारवाडी ग्रामपंचायत व सरपंच म्हणून पवळ सोनाली सर्जेराव तर उपसरपंच म्हणून तांदळे विकास वैजनाथ नागापूर (बु) सरपंच मुक्ताबाई सुखदेव ढोकणे तर उपसरपंच आशा शंकर टेकाळे, कर्जनी ग्रामपंचायत वर सरपंच म्हणून गायकवाड सखुबाई सुंदर तर उपसरपंच म्हणून जाधव मुक्ता मल्हारी वायभट वाडी येथे सरपंच म्हणून जलाबाई रामकिसन वायभट तर उपसरपंच म्हणून गणेश हनुमान वायबट यांच्या निवडी घोषित करण्यात आल्या आहेत.
आज एकूण 15 ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच पदाच्या निवडी होत्या त्यापैकी 10 ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात आल्या आहेत, आज झालेल्या निवडीमुळे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे असलेल्या 19 ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे सरपंच उपसरपंच निवडून आले आहे.