शिवसेनेचा दसरा मेळावा ऑनलाइन नाही, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे भाषण व्यासपीठावरुनच होणार; संजय राऊतांनी केले स्पष्ट


 

स्थैर्य, दि.१८: राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरुच आहे. दरम्यान कोरोनाची खबरदारी म्हणून राज्यभरात सार्वजनिक कार्यक्रम घेणे टाळले जात आहेत. दरम्यान आता शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा ऑनलाइन होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे भाषण हे व्यासपीठावरुनच होणार असल्याचे संजय राऊतांनी स्पष्ट केले आहे. टीव्ही9 या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे स्पष्ट केले आहे.

कोरोनामुळे यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा हा ऑनलाइन घेण्यात येईल अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. मात्र या सर्व चर्चांना शिवसेना खासदार संजय राऊतांनी पूर्णविराम दिला. कुणी सांगितले की, शिवसेनेचा दसरा मेळावा ऑनलाइन होईल? उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असले तरी ते पक्षप्रमुख आहेत. त्यामुळे त्यांचे भाषण हे व्यासपीठावरूनच होईल. त्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. असे म्हणत संजय राऊतांनी दसरा मेळावा व्यासपीठावरुनच होण्याविषयी संकेत दिले आहेत.

दरम्यान दसरा मेळावा हा शिवसेनेची अनेक वर्षांपासून सुरू असलेली परंपरा आहे. मात्र यंदा कोरोनामुळे ही परंपरा ऑनलाइन पध्दतीने सुरू ठेवण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. याविषयी वृत्तवाहिनीशी बोलताना राऊत म्हणाले की, दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे. सांस्कृतिक आणि राजकीयदृष्ट्या हा मेळावा महत्त्वाचा आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सगळ्या गोष्टी ऑनलाइन होत आहेत. मात्र मी आजच वाचले की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहारमध्ये 12 सभा घेणार आहेत. त्या कशाप्रकारे सभा घेतात त्याचा आम्ही अभ्यास करणार आहोत. सर्व नियम वगैरे पाळूनच सभेचे आयोजन करण्यात येईल.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!