शिवसेनेचे पोवई नाक्यावर आंदोलन; पोलिसांनी कंगणा रानावत यांचा प्रतिकात्मक पुतळाच घेतला ताब्यात; आंदोलनकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १४ नोव्हेंबर २०२१ | सातारा | अभिनेत्री कंगणा रानावत हिने भारतीय स्वातंत्र्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ साताऱ्यात शिवसेनेने शनिवारी पोवई नाक्यावर घोषणाबाजी केली . सेनेच्या नियोजित जोडे मारो आंदोलना पूर्वीच पोलिसांनी हस्तक्षेप करत पुतळा ताब्यात घेतल्याने आंदोलकांचा मात्र हिरमोड झाला .

पोवई नाक्यावर अभिनेत्री कंगणा रानावत हिचा प्रतिकात्मक पुतळा तयार करुन जिल्हा प्रमुखांची प्रतिक्षा करत थांबले होते. आंदोलनास सुरुवात होताच पुतळा आंदोलनस्थळी आणतानाच पोलिसांनी पुतळा ताब्यात घेतल्याने शिवसैनिकांचा हिरमोड झाला. पोलिसांजवळ शिवसेनेचे शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली.

शिवसेनेचे जिल्हा प्रमुख यशवंतराव घाडगे यांनी अचानकपणे अभिनेत्री कंगणा रानावत हिच्या निषेधार्थ आंदोलन करण्याचे आदेश सातारा शहरातील शिवसैनिकांना फोनवरुन देताच सातारचे उपजिल्हा प्रमुख सचिन मोहिते, सातारा तालुका प्रमुख आतिश ननावरे, शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे शहर प्रमुख निलेश मोरे यांच्यासह शिवसैनिक पोवई नाक्यावर उपस्थित झाले . कंगणा रानावत हिचा प्रतिकात्मक पुतळाही तयार करुन ठेवला होता. जिल्हा प्रुमख यशवंतराव घाडगे हे येताच कार्यकर्त्यांनी जय भवानी जय शिवाजी देशद्रोही कंगणा रानावत हिचा निषेध असो अशा घोषणा दिल्या. सचिन मोहिते यांनी रस्त्याच्या पलिकडे उभ्या असलेल्या कार्यकर्त्यास प्रतिकात्मक पुतळा घेवून येण्यास सांगितले. तो पुतळा घेवून आंदोलनाच्या ठिकाणी येताच पोलिसांनी तो ताब्यात घेतला. पोलिसांनी पुतळा ताब्यात घेताच शिवसेनेचे शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली.


Back to top button
Don`t copy text!