
स्थैर्य, म्हसवड, दि.१६: काळचौंडी ता माण येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीच्या मतदाना दिवशी येथील सहा जणांनी शिवसेनेचे तालुकाप्रमुख व उपतालुकाप्रमुखावर तलवार व काठ्या हातात घेऊन हल्ला केल्याची घटना घडली असून या हल्ल्यानंतर पोलिस तक्रार घेण्यास टाळाटाळ करीत होते. माणखटावचे पदाधिकारी व शिवसैनिकांनी आज दुपारी सुमारे एक तास पोलिसांच्या भूमिकेविरोधात पोलिस स्टेशन समोर भर उन्हात ठिय्या आंदोलन केल्यानंतर२४ तासा नंतर शिवसैनिकावरील हल्ल्याची तक्रार घेण्यात आली आहे. याबाबत फिर्यादीने म्हटलं आहे कि दि १५ जानेवारी रोजी दुपारी ४:१५ चे सुमारास मौजे काळचौंडी गावच्या हद्दीत काळचौंडी चौक ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात सुमारे २०० मीटर अंतरावर मी तालुकाप्रमुख बाळासाहेब महंमद मुलाणी व उपतालुकाप्रमुख शिवदास महादेव केवटे मतदानाविषयी स्थानिक पदाधिकारी यांचेकडून माहिती घेत असताना त्या ठिकाणी तलवारी व काठ्या हातात घेऊन विशाल बाळासो माने,विलास काशिनाथ माने,सचिन काशिनाथ माने,स्वप्निल सचिन माने,ऋषिकेश बाळासो माने, विष्णू आबाजी माने हे सहा जण आले व त्यांनी सर्वानी लांडक्या तु इथे कशाला आलास याला कापून टाकूया असे म्हणून माझेवर व शिवदास केवटे रा म्हसवड यांचेवर हल्ला केला.तसेच माझ्या खिशातील झालेल्या झटापटीत पाच हजार तीनशे रुपये वरील पैकी कोणीतरी काढून घेतले आहेत. घटना घडली त्या दिवशी संध्याकाळी सात ते रात्री आकरा पर्यत पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी थांबलो असतानाही पोलिस अधिकारी तक्रार घेण्यास तयार नव्हते उलट आम्हालाच दमदाटी व कुठल्या तरी गुन्ह्यात आडकवण्याची धमकी देत होते.हा सर्व घडलेला वृत्तांत जिल्हाप्रमुख व वरिष्ठांना कळवल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी माणखटावचे शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले असता पोलिस अधिकारी बाजीराव ढेकळे तक्रार घेण्यास तयार नसल्यामुळे पदाधिकारी व शिवसैनिकांनी पोलिस स्टेशन समोर भर उन्हात ठिय्या मांडल्यानंतर घडलेल्या घटनेची तक्रार घेण्यात आली आहे. यावेळी जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव,उपजिल्हाप्रमुख संजय भोसले,संघटक रामभाऊ जगदाळे, खटाव तालुकाप्रमुख युवराज पाटील, यांनी भेट दिली शहरप्रमुख राहूल मंगरुळे,सुशांत पार्लेकर,उपतालुकाप्रमुख आंबादास शिंदे,बाळासाहेब जाधव,युवासेना तालुकाध्यक्ष क्रुष्णराज आवळे-पाटील, अंबादास नरळे,अमित कुलकर्णी,सोमनाथ कवी,किशोर गोडसे,समीर जाधव, ए.के.नामदास, उपशहरप्रमुख आनंद बाबर,शाखाप्रमुख सतिश विरकर,प्रितम तिवाटणे,सिध्दनाथ कवी,सोनु मदने तसेच असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
प्रतिक्रिया – १) चंद्रकांत जाधव जिल्हाप्रमुख शिवसेना. – सत्तेतल्या पक्षावर हि वेळ तर बाकीच्याचे तर विषय च सोडा. तक्रार घेयची सोडा तक्रारदारालाच शिवीगाळ दमदाटी करणार्या मगरुर पोलिस अधिकार्याची ताबडतोब बदली झाली पाहिजे. अन्यथा शिवसेना पक्षाच्यावतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी दिला.
२) संजय भोसले शिवसेना सातारा जिल्हा उपाध्यक्ष म्हसवड पोलिस ठाण्याचे एपीआय ढेकळे हे भाजपा आमदारांचे हस्तक आहेत का ? शिवसैनिकांना फिरण्यास मज्जाव करण्याची सुपारी घेतली आहे का शिवसेना हि सामान्यासाठी लढणारी सत्तेत असलेली संघटना आसताना हि तालुका प्रमुख बाळासाहेब मुलाणी व बापुराव कबीर विभाग प्रमुख म्हसवड यांना गुंडा प्रमाणे वांगणुक देणारे म्हसवड ठाण्याचे प्रमुख यांचेवर कारवाई करण्याची मागणी ना शंभुराजे देसाई यांचे कड़े करणार आहे.