शिवसेना शिंदे गटाची आज दुपारी फलटण तालुका माढा लोकसभा आढावा बैठक

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. १० डिसेंबर २०२३ | फलटण |
राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते ना. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार फलटण येथील इरिगेशन बंगला रेस्ट हाऊसमध्ये आज, रविवार, दि. १० डिसेंबर २०२३ रोजी दुपारी २ वाजता शिवसेना फलटण तालुका माढा लोकसभा आढावा बैठक आयोजित केली आहे.

यावेळी शिवसेना पक्षाचे माढा लोकसभा निरीक्षक विलेपार्लेचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यावेळी सर्व शिवसैनिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना फलटण तालुकाप्रमुख श्री. नानासो इवरे यांनी केले आहे.

या बैठकीस शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. चंद्रकांतदादा जाधव, युवा सेनाप्रमुख रणजितदादा भोसले, महिला जिल्हाप्रमुख सौ. शारदाताई जाधव आदी प्रमुख नेत्यांचीही उपस्थिती असणार आहे.

Back to top button
Don`t copy text!