शिवसेना-राष्ट्रवादी पालिका निवडणुकीसाठी एकत्र; आगामी काळात औरंगाबादसह 10 मनपा, 27 जिल्हा परिषदांच्या निवडणुका

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि २२: राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आघाडी करून लढवणार आहेत. यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी सरकारचा तिसरा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने सोमवारी (दि. २२) बैठक बोलावली आहे.

वर्ष २०२१ आणि २०२२ मध्ये मुंबई, औरंगाबाद, नवी मुंबईसह १० महानगरपालिका, ९८ नगर परिषदा आणि २७ जिल्हा परिषदांच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुका म्हणजे मिनी विधानसभा निवडणुका मानल्या जातात. यासंदर्भात राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले की, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी या निवडणुका एकत्रतपणे लढवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपला मात देणे महाविकास आघाडी सरकारचा मुख्य कार्यक्रम आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोघांनी एकत्रित आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्याचे ठरवले आहे. मात्र पुणे, कोल्हापूर यासारख्या महापालिकांमध्ये स्थानिक परिस्थिती पाहून आम्ही स्वतंत्रपणे लढू, असे शिवसेनेच्या एका नेत्याने सांगितले.

काँग्रेसची आज मुंबईत बैठक
सत्ताधारी आघाडीतील तिसरा पक्ष असलेल्या काँग्रेसने सोमवारी मुंबईत बैठक बोलावली आहे. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात मंथन होणार आहे.


Back to top button
Don`t copy text!