
स्थैर्य, म्हसवड, दि.०२: सातारा जिल्ह्यात बँक निवडणुकीसाठीच्या ठरवानंतर डॉ. नानासाहेब शिंदे यांच्या अपहरणाचा तपास सुरु असताना पोलिसांसमोर आणखी दोघांच्या अपहरणाची घटना उघडकीस आल्याने अपहरण प्रकरणाने वेगळे वळण घेतले असुन तपास करताना कुळकजाई येथे शनिवारी रात्री ११ वाजता सापडले होते त्यास जवळ जवळ २४ तास होऊंन गेल्यावर रविवारी रात्री धनाजी आबा शिंदे यांनी विजय छबू चव्हाण यास शेखर गोरेसह इतर पाच कार्यक्रत्यावर सामुहिक रित्या अपहरण करुन बेकायदेशीर पणे डांबूण ठेवल्याची म्हसवड पोलिसात अपहरणाची तक्रार दाखला करुन यातील दोन संशयीतांना ताब्यात घेतले असुन इतर चौघाचा तपास सुरु आहे
पाणवन या माण येथील धनाजी आबा शिंदे हे गत पांच वर्षापूर्वी पाणवन सोसायटीचे चेअरमन होते सहा वर्षापूर्वी जिल्हा बॅकेच्या निवडणुकीचा ठराव धनाजी शिंदे यांचा झाला होता त्याच्यासह पळसावडे व इतर दोन अशा पाच ठरावाची हमीं धनाजीने घेत शेखर गोरे यांना मदत करण्याच्या आर्थीक निकशावर ठरले होते त्याची फरत बेड म्हणून त्यांना मदत करण्याच्या उदेशाने ते स्वता कुळकजाईला गेले होते त्याच दरम्यान डॉ नानासाहेब शिंदे अपहरणाची घंटणा झाली व त्याच्या तपासासाठी पोलिस कुळकजाईला गेले होते त्यावेळी शिंदे व चव्हाण फार्म हाउस वर सापडले होते त्यांना म्हसवड ठाण्यात आणले होते त्या दोघांची चौकशी केल्या नंतर त्या दोघांच्या अपहरणप्रकरणी शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर अपहरणाचा गुन्हा म्हसवड पोलिसांत नोंद झाला आहे. अपहरण का व कशासाठी करण्यात आले याचा तपास पोलीस करत आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पानवन (ता. माण) येथील धनाजी आबाजी शिंदे व त्यांचे मित्र छुब चव्हाण यांना गुरुवार (दि. 25) पासून रविवार (दि. 28) पर्यंत गायब होतो. आम्हां दोघा मित्रांना शेखर भगवान गोरे, राजेंद्र उर्फ राजू ब्रम्हदेव जाधव, संग्राम अनिल शेटे, दत्ता घाडगे, राहुल अर्जुन गोरे, वीरकुमार पोपटलाल गांधी व गाडीवरील चालक हरिदास गायकवाड यांनी त्यांच्या ईनोवा गाडी (क्र. एमएच 11 – 7057) मधून जबरदसतीने बसवून कुळकजाई येथील फार्म हाऊस तसेच ठाणे येथील लॉजवर थांबवून ठेवले होते. याबाबत धनाजी आबाजी शिंदे यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार शेखर गोरे यांच्यासह वरील सहा जणांवर अपहरणाचा गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास म्हसवड पोलीस करत आहेत.
अपहरण झालेले डॉ शिंदे सापडले सोलापुर जिल्ह्यात
शनिवारी रात्री ८ च्या दरम्यान शेतात पाणी देणासाठी गेलेले डॉ नानासाहेब शिंदे यांचे अपहरण करून त्यांच्या ताब्यातील चार चाकी गाडीतील ड्रायव्हरच्या पाठिमागील सिट जाळून टाकल्याने हां घात पात कि जिल्ह बॅकेच्या निवडणुकीसाठी त्यांची सरपंच असलेली पत्नी जयश्री यांचा मतदाणाचा ठराव झाला होता यावरुनच त्यांचे अपहरण झाले असल्याने जिल्ह्याचे डझनभर अधिकारी गेले तीन दिवसापासुन तपासासाठी तळ ठेकूण आहेत तर काही स्थानिक गुन्हे अन्वेशन विभाग, पोलिस कर्मचारी ,एल सी बी पथक श्वान पथक म्हसवड शहराच्या परिसरात शेजारच्या तालुक्यात शोध मोहिम जोरात सुरू होती या शोध मोहिमेला अखेर रविवारी रात्री ११ वाजता यश आले असुन अपहरणकर्ते डॉ नानासाहेब शिंदे सोलापुर जिल्ह्यात तांदुळवाडी या ठिकाणी गुन्हे अन्वेशन विभागाचे एपीआय साबळे व त्यांची टिम व म्हसवड पोलिस ठाण्याचे एपीआय बाजीराव ढेकळे यांच्या टिमला खबर मिळाली होती.