महा विकास आघाडीमध्ये शिवसैनिकांना न्याय मिळाला नाही – उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २१ ऑगस्ट २०२२ । सातारा । गेल्या अडीच वर्षात एकही निर्णय शिवसैनिकाच्या न्यायासाठी झाला नाही. राष्ट्रवादी व काँग्रेस बरोबर युती करून सरकार स्थापन केले. त्यांनी शिवसेना खाऊन टाकली. शिवसेना पक्ष संपवण्यासाठीच या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी कामे केली असल्याची टीका राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना. शंभूराज देसाई यांनी केली.

एका हॉटेलमध्ये आयोजित शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव, जिल्हा संपर्क प्रमुख शरद कणसे, जयवंत शेलार, चंद्रकांत जाधव, एकनाथ ओंबळे, निलेश मोरे आदी उपस्थित होते.

ना. देसाई म्हणाले, सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार असा शब्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 2019 साली सरकार स्थापनेवेळी दिला होता. त्यावेळी आम्हाला वाटले भाजप-शिवसेना युती होणार आहे. मात्र, त्यानंतर दोन दिवसात तो शब्द फिरला आणि राष्ट्रवादी व काँग्रेस बरोबर युती करून सरकार स्थापन केले जाणार असे पक्षप्रमुखांनी सांगितले. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह सर्व आमदारांनी याला विरोध केला होता. कारण हे दोन्ही शिवसेना खाऊन टाकतील आणि आपला पक्ष संपवतील हे आम्ही सांगितले होते. शिवभोजन केंद्र सुरु करण्याची संकल्पना उद्धव ठाकरे यांनी मांडली. अडीच वर्षात एकही शिवसैनिकाला शिवभोजन केंद्र मिळाले नाही. राष्ट्रवादी नेत्यांनी यादी दिली की मंजूर असा सर्व कारभार अडीच वर्षे सुरु होता. या अडीच वर्षात कोणताही निर्णय शिवसैनिकाला न्यायासाठी झाला नाही.

आ. महेश शिंदे म्हणाले, आम्ही जनतेशी गद्दारी केली असे अनेकजण बोलत आहेत. आम्ही जनतेशी गद्दारी केली नाही. उलट तुम्ही जनतेशी गद्दार केली आहे. ठाकरे कुटुंबात दोन मंत्रीपदे असताना तुम्ही जनतेची सेवा न करता घरात बसलात. खरे गद्दार तुम्ही आहात आम्ही नाही. जिल्हयात शिवसेना व भाजपची ताकद वाढवण्यावर भर देणार आहे. काही जण तिकडे राहिलेली आहेत. उद्या ते आपल्याबरोबरच येणार आहेत. आगामी काळात पूर्ण ताकदीने काम करायचे आहे त्यामुळे आतापासूनच कामाला लागा अशा सूचना केल्या.

शिंदे गटाच्या कार्यक्रमात अजितदादांचे कौतुक
‘शंभूराज देसाई म्हणाले, आम्ही मंत्री असूनही फोन केला कि साहेबाना निरोप देतो असे सांगितले जात होते. तो निरोप जात होता का हे माहित नाही. पण आमची कधीही दखल घेतली नाही. आज मात्र मातोश्रीवर ओपन प्रवेश आहेत. मंत्रालयाच्या सहाव्या दालनात तर मुख्यमंत्री यांचे दालनात तर कोविड होता. पण त्याचवेळी शेजारील उपमुख्यमंत्री दालनात मात्र तोबा गर्दी. उपमुख्यमंत्री दालनात आमदार पदाधिकारी थेट जाऊन कामे करून घेत होते. तेथे कोविड नव्हता का असा सवाल त्यांनी केला.


Back to top button
Don`t copy text!