
दैनिक स्थैर्य । 29 मार्च 2025। फलटण । येथील शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानच्यावतीने छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त शनिवार दि. 29 रोजी सायंकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक व ते माळजाई या मार्गावर मूक पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
त्याचबरोबर तालुक्यातील गावांमध्ये अशाचप्रकारे मूक पदयात्रा काढण्यात येणार आहे.
या मूक पदयात्रेत सहभागी होण्याचे आवाहन शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानतर्फे करण्यात आले आहे.