दैनिक स्थैर्य । दि. २० फेब्रुवारी २०२३ । बारामती । छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करणे हा नाचण्याचा विषय नसून, त्यांचे विचार डोक्यात घेऊन रोजच्या जीवनात आचरणात आणण्याचा आहे. हा विचार पोचवण्यासाठी घाडगेवाडी येथे संभाजी ब्रिगेडतर्फे शिवजयंती नाचून न करता वाचून साजरी करण्यात आली. राजमाता जिजाऊ चौकात उपसरपंच पुनम तुपे यांच्या हस्ते शिवपूजन करून शिवप्रेमींना कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकांच्या प्रती वाटण्यात आल्या. या प्रसंगी गावच्या उपसरपंच पुनम तुपे, संभाजी ब्रिगेड बारामती तालुकाध्यक्ष तुषार तुपे, तालुका संघटक विशाल भगत, संभाजी ब्रिगेड उद्योजक आघाडी उपाध्यक्ष अजित चव्हाण, घाडगेवाडी शाखाध्यक्ष अभिजीत बळीप, उपाध्यक्ष कार्तिक काकडे, सचिव निलेश फडतरे, खजिनदार प्रशांत काकडे, कार्याध्यक्ष सोमनाथ पवार, संघटक अमरजित तुपे, आकाश चव्हाण, तेजस नांदगुडे, रणजित तुपे, अमित चव्हाण, सतिश तुपे, सुभाष शिंदे, शरदराव तुपे, शिवाजी काकडे, कुंडलिक शिंदे, सुर्यकांत वाघ, सागर बगाडे, महादेव भगत, प्रविण तुपे, आप्पासो वाघ, गणेश चव्हाण, रोहन चव्हाण, सुरज चव्हाण, नवनाथ मगर, सोमनाथ गरड आदी उपस्थित होते.
तसेच २५ फेब्रुवारी सायंकाळी ८ वाजता प्रसिद्ध व्याख्याते निलेश जगताप यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आल्याचे आयोजक यांनी सांगितले.